घरमहाराष्ट्रखुद्द पालिकेच्याच लिफ्टमध्ये अडकले महापौर

खुद्द पालिकेच्याच लिफ्टमध्ये अडकले महापौर

Subscribe

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्याच लिफ्टमध्ये महापौर अडकल्याची घटना घडली. काही वेळात त्यांची सुटका करण्यात आली. अशी घटना घडल्याची ही तिसरी घटना असताना देखील माहापालिकेला जाग येत नाहीये. जर लवकरात लवकर या लिफ्टची दुरुस्ती केली नाही तर एखाज्याचा जीव जाऊ शकतो.

पिंपरी- चिंचवडचे महापौर बुधवारी महापालिकेच्याच लिफ्टमध्ये अडकले. सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. महापालिकेच्या लिफ्टमधून खाली येत असताना अचानक पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याच्या मधोमध लिफ्ट अडकली. काही वेळातच त्यांची लिफ्टमधून सुटका करण्यात आली. हा संपर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

अचानक लिफ्ट बंद पडली

याप्रकारामुळे सर्वांचीची तारांबळ उडाली. या लिफ्टमध्ये महापौर नितीन काळजे यांच्यासह तीन महिला नगरसेविका, सुरक्षा रक्षक आणि लिफ्टमन होते. या लिफ्टमध्ये लिफ्टमन असल्याने त्याने ताबडतोब यासर्वांची सुटका केली. लिफ्ट थांबवून स्टूलाच्या सहय्याने या सर्वांना खाली उतरवण्यात आले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. महापौरांसोबत या सहा जणांची लिफ्टमधून सुटका झाल्यानंतर त्यांनी सुटकेचा श्वास घेतला.

- Advertisement -

याआधी घडल्या होत्या अशा घटना

पिंपरी – चिंचवड महापालिकेत हा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे. काही दिवसांपूर्वी एक पत्रकार या लिफ्टमध्ये तब्बल २० मिनिटे अडकला होता. त्यावेळी लिफ्टमध्ये कोणिच नव्हते. बऱ्या वेळानंतर या पत्रकाराची सुटका करण्यात आली. तर काही महिन्यांपूर्वी एक कर्मचारी लिफ्टमध्ये अडकला बाहेर पडत असताना त्याच्या पाय फॅक्चर झाला. ऐवढे सर्व प्रकार घडून देखील महापालिका प्रशासन काहीच करत नसल्याचे समोर आले आहे. जर लवकरात लवकर या लिफ्टची दुरुस्ती केली नाही तर एखाज्याचा जीव जाऊ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -