घरदेश-विदेशकरोना व्हायरसमुळे नव्यानेच लग्न झालेल्या जोडप्याची झाली पंचाईत!

करोना व्हायरसमुळे नव्यानेच लग्न झालेल्या जोडप्याची झाली पंचाईत!

Subscribe

चीनमध्ये वेगाने पसरत असलेल्या करोना व्हायरसमुळे जगभरात भितीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर चीनमध्ये जाण्यासाठी अनेक देशांनी प्रवासबंदी जाहीर केली आहे. भारताने देखील चीनमधील नागरिकांसाठी आणि चीनमध्ये असलेल्या परदेशी नागरिकांसाठी ई-व्हिसा सुविधा काही काळासाठी स्थगित केली आहे. केरळमध्ये तीन करोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळल्यामुळे अधिकाधिक काळजी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर एका नवविवाहित जोडप्याची मात्र या करोना व्हायरसने चांगलीच पंचाईत करून ठेवली आहे. नुकतंच लग्न झालेल्या या जोडप्याला रोज आरोग्यविषयक तपासण्यांना सामोरं जावं लागत आहे.

आरोग्य कर्मचारी दारावर येऊन थडकले!

त्याचं झालं असं, की मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यात राहणाऱ्या सत्यार्थ मिश्राचं नुकतंच लग्न झालं होतं. मोठ्या थाटामाटात लग्न झाल्यानंतर सत्यार्थ मिश्रांनी फिरायला जाण्याचं प्लॅनिंग देखील करून टाकलं होतं. सारंकाही व्यवस्थित सुरळीत सुरू होतं. पण यात एक मोठी समस्या होती. त्यांच्या पत्नीचं नाव आहे झिहाओ वांग. ती चीनची आहे. आणि त्याहून मोठी समस्या म्हणजे त्यांचं लग्न नेमकं त्या वेळी झालं, जेव्हा चीनमध्ये करोना व्हायरस वेगाने फैलावत आहे. झालं, जिल्ह्यातले आरोग्य अधिकारी तिच्या आणि तिच्या कुटिंबियांच्या मागे हात धुवून लागले!

- Advertisement -

सत्यार्थ मिश्रा आणि झिहाओ वांग यांच्या लग्नासाठी झिहाओचे अनेक नातेवाईक चीनहून आले होते. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटाच होती. या लग्नाविषयी कळताच आरोग्य अधिकाऱ्यांनी सत्यार्थच्या घरी धाव घेतली. ताबडतोब त्या सगळ्यांना आरोग्य केंद्रावर नेण्यात आलं आणि त्यांच्या तपासण्या सुरू झाल्या.

‘आम्हाला काहीही अडचण नाही’

खरंतर, इतर कुठलं कारण असतं, तर एव्हाना लग्नघरच्या मंडळींचा पारा चांगलाच चढला असता, आणि त्यांनी समोरच्या अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं असतं. पण मुद्दा करोना व्हायरसचा होता. ‘आम्हाला या सगळ्यामागचं कारण माहिती आहे. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांना सहकार्य करायला आम्हाला काहीही अडचण नाही. शिवाय चीनमध्ये आम्ही राहातो त्या शहरामध्ये करोना व्हायरसचा अजिबात धोका नाही. त्यामुळे आम्हाला तिथे परत जायला देखील काहीही समस्या नाही’, असं झिहाओचे वडील शिबो यांचं म्हणणं आहे.


हेही वाचा – भारतात करोना व्हायरसचा तिसरा रुग्ण आढळला!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -