घरताज्या घडामोडीउन्हात बसलेल्या महिलेला कारची धडक

उन्हात बसलेल्या महिलेला कारची धडक

Subscribe

आरटीओ कार्यालयाकडे जाणार्‍या पेठरोडवरील झोपडी समोर उन्हात बसलेल्या महिलेस भरधाव चारचाकी अज्ञात वाहनाची ठोस बसल्याने तीचा मृत्यू झाला आहे. लता आनंदा शेवरे (22 रा.अंबिकानगर झोपडपट्टी, पेठरोड) असे या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सविता गणेश जाधव (20, रा.अंबिका नगर, पंचवटी) यांनी वाहन चालकाविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी (दि.2) साडेबारा वाजेच्या सुमारास पेठरोड येथील वडाचे झाडाजवळ लता शेवरे या उन्हात बसलेल्या असताना पेठनाक्याकडून आलेल्या सफेद रंगाच्या गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. यात लता यांच्या डोक्याला जोरात मार बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. सी. कासर्ले अधिक तपास करत आहेत.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -