घरदेश-विदेशचुकीच्या ट्विटमुळे दिग्विजय सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल; शिवराज सिंह चौहानांनी केले आरोप

चुकीच्या ट्विटमुळे दिग्विजय सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल; शिवराज सिंह चौहानांनी केले आरोप

Subscribe

खरगोन हिंसाचार प्रकरणी चुकीचे ट्विट केल्याप्रकरणी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चुकीच्या ट्विटमुळे दिग्विजय सिंह यांच्याविरोधात कलम 153-A, 295A (कोणत्याही धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने जाणूनबुजून आणि दुर्भावनापूर्ण कृत्ये करणे) 465 आणि 505 (2) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर दंगल भडकवल्याचा आरोप केला आहे. शिवराज यांनी ट्विट करून एका धार्मिक स्थळावर भगवा झेंडा फडकावणाऱ्या तरुणाचा दिग्विजय यांनी प्रसिद्ध केलेला फोटो मध्य प्रदेशातील नसल्याचे म्हटले आहे. धार्मिक उन्माद पसरवण्याचा हा डाव आहे. येथे शिवराज सिंह यांनी खरगोन दंगल प्रकरणी गृह विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक कडक करण्याच्या सूचना देण्यात आल्या. भोपाळचे आमदार रामेश्वर शर्मा आणि नेते गुन्हे शाखा पोलिस ठाण्यात पोहोचले आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी केलेल्या ट्विटची तक्रार केली.

- Advertisement -

आमदार रामेश्वर शर्मा यांनी ट्विट करून लिहिले की, सीएम शिवराज सिंह चौहान यांना विनंती आहे की, दिग्विजय सिंह यांच्याकडून धार्मिक भावना भडकावण्याचे, दंगली घडवण्याचे आणि समुदायांमध्ये तेढ वाढवण्याचे काम केले जात आहे जेणेकरून राज्य दंगलीत ढकलले जाईल. त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

यापूर्वी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले की, दिग्विजय सिंह यांच्या शांतता दूतांनी रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक केली तेव्हा त्यांनी ट्विट करून कोणताही प्रश्न उपस्थित केला नाही. आता आम्ही दंगलखोरांवर कारवाई करत असताना दिग्विजय सिंह यांना वेदना होत आहेत. दिग्विजय सिंह यांना संभ्रम निर्माण करून जातीय तणाव वाढवायचा आहे.


बँकवाले, फायनान्सवाले दारात आल्यावर लोकांना मनसेवाला आठवतो, वसंत मोरेंचा हल्लाबोल


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -