घरताज्या घडामोडीबँकवाले, फायनान्सवाले दारात आल्यावर लोकांना मनसेवाला आठवतो, वसंत मोरेंचा हल्लाबोल

बँकवाले, फायनान्सवाले दारात आल्यावर लोकांना मनसेवाला आठवतो, वसंत मोरेंचा हल्लाबोल

Subscribe

कोरोना काळात राज्य सरकार आणि महानगरपालिकांनी जी कामे केली नाहीत ती कामे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहेत. कोरोना काळात नागरिकांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मदत केली आहे. बँकवाले, फायनान्सवाले ज्यावेळी त्रास देऊ लागले तेव्हा मनसेच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांचे प्रश्न सोडवले आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी कोरोना काळात जोरात काम केले, प्रत्येकाने लोकांना अन्न आणि मदत दिली. परंतु ज्या वेळी दरवाजात बँकवाले आणि फायनान्सवाले उभे राहतात तेव्हा सगळ्यांना मनसेवाला आठवतो. त्यामुळे सगळ्यांनीच याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे असे पुणे नगरसेवक वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.

पुण्यात ज्यावेळे कोरोना काळ सुरु होता. त्या काळात सरकारच्या माध्यमतून जी कामे झाली पाहिजे होती ती कामे करण्यात आली नाही. पालिकेनेसुद्धा काम केले नाही. परंतु पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात फक्त मनसे काम करत होती हे सगळे तुम्ही पाहिले आहे. पुण्यासह महाराष्ट्रातील सगळे नेते घरात बसलेले असताना मनसेचे पदाधिकारी रस्त्यावर होते. कोरोना काळात, कठीण काळात जो स्टॅंड पुण्यात घेण्यात आला त्यामध्ये एक अम्बेसेडर गाडीची काच फुटली आणि त्याचा आवाज पूर्ण महाराष्ट्राने ऐकला आणि त्यानंतर जे काम झाले ते एकदिवसाच्या कालावधीत पुण्यात झाले तसेच महाराष्ट्रत सुरु झाले.

- Advertisement -

निवडणूक लागल्यास मनसेचा विचार होत नाही

कोरोनाचा ट्रेंड बदलला त्यानंतर गरिबांना बँका, फायनान्सवाल्यांनी त्रास देण्यासाठी सुरुवात केली. प्रत्येकाच्या दारात एजंट यायला लागले अशावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दारे उघडी होती. तुम्ही पाहिले आहे. सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे फायनान्सवाला दारात आला की, मनसेवाला आठवतो बँकेवाला आला की मनसेवाला आठवतो, पैसे वसुलीसाठी आला तर मनसेवाला आठवतो, निवडणूक लागतात तेव्हा मनसेवाल्याचा विचार का होत नाही आहे. आपण पोहोचत नाही आहे. याचा विचार लोकांनी केला पाहिजे.

ऑक्सिजनची गरज पडत होती त्या ठिकाणी मनसे जात होती. सरकारने जी कामे करायला हवी होती ती कामे मनसेचे पदाधिकारी करत होते. पुण्यात साईनाथ बाबर एकटा ५ हजार लोकांना अन्न पाकिटे पुरवत होता. स्वतः सरकार मागे पडत होते त्यावेळी लोकांसाठी दवाखाने उभे केले. कोविडची लढाई सुरु असताना हे सर्व पाहत होता.

- Advertisement -

गेल्या दोन तीन महिन्यांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या तब्येतीमध्ये अडचणी सुरु आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या भेटीमध्येही त्यांचा त्रास जाणवत होता. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते तेव्हा सगळ्यांनी पाहिले राज ठाकरेंना त्रास होत होता, एक पायरी चढता येत नव्हती तिथे ते १० पायऱ्या चढत होते. शाखाध्यक्षांच्या घरी राज ठाकरे गेले जर ते या गोष्टी करत असतील तर आपण कसे काम करतोय हे लक्षात घेतलं पाहिजे.


हेही वाचा : चंद्रकांत पाटीलांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली, वसंत मोरेंची मनसेच्या उत्तरसभेत कबुली

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -