घरदेश-विदेशकेरळमध्ये एनआयएचे तीन ठिकाणी छापे; ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

केरळमध्ये एनआयएचे तीन ठिकाणी छापे; ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

Subscribe

एनआयएने केलेल्या छापेमारीत मोबाईल फोन, सिमकार्ड, मेमरी कार्ड, पेन ड्राइव्ह, डायरी आणि इस्लामिक धर्मगुरु जाकीर नाईक याच्या भाषणाची डीव्हिडी जप्त केली आहे.

एनआयए म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणांनी केरळमध्ये तीन ठिकाणी छापेमारी केली. २०१६ त्या आयईएसआईएस कासरगोड मॉड्यूल प्रकरणात त्यांनी तीन संशयितांना अटक केली आहे. या तिघा जणांचा कासरगोड मॉड्यूलमध्ये संबंध असल्याचा संशय एनआयएने व्यक्त केला आहे. या तिघांचा संबंध आयसीस या दहशतवादी संघटनेशी असून भारतातून जे आयसीस या संघटनेमध्ये सहभागी झाले आहेत त्यांच्याशी ते संपर्कात आहेत.

- Advertisement -

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये तीन घरांवर छापे टाकून पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली. एक संशयित पलक्कड भागातला असून दोन जण कासरगोड येथील आहे. एनआयएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तपास यंत्रणांना माहिती मिळाली होती की, केरळमधील तीन जण त्या संशयितांच्या संपर्कात आहेत जे आयसीस या दहशतवादी संघटनेत सहभागी झाले आहेत. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे एनआयएने छापे टाकले आहेत. एनआयएने केलेल्या छापेमारीत मोबाईल फोन, सिमकार्ड, मेमरी कार्ड, पेन ड्राइव्ह, डायरी आणि इस्लामिक धर्मगुरु जाकीर नाईक याच्या भाषणाची डीव्हिडी जप्त केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, श्रीलंकेच्या कोलंबो शहरामध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये अटक करण्यात आलेल्या संशयितांचा संबंध असल्याचा संशय आहे. श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटाचा संपर्क थेट भारतामध्ये असल्याचे देखील उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेल्या दोन तरुणांचा श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार जहरान हाशीमसोबत थेट संपर्क होता. दरम्यान, या तरुणांची एनआयएच्या मुख्यालयामध्ये चौकशी सुरू आहे. श्रीलंकेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये आतापर्यंत ३५० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू तर ५०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी १०० संशयितांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, हे प्रकरण पहिल्यांदा मागच्या वर्षी तेव्हा समोर आले होते जेव्हा एनआयएने कासरगोडमध्ये एका आईएसआईएस मॉड्यूलचे प्रकरण समोर आणले होते. त्यावेळी तपास यंत्रणांनी एका २५ वर्षीय तरुण हबीब रहमान याला अटक केली होती. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये कासरगोडमधून १४ आरोपींनी भारत सोडून दहशतवादी संघटना आयसीसमध्ये सहभाग झाले होते. कासरगोड हा भाग प्रसिध्द यासाठी आहे की, या भागातील अनेक तरुण दहशतवादी संघटनेशी प्रभावित झाले असून ते या संघटनेत सहभागी होण्यासाठी अफगाणिस्तानात गेले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -