घरमहाराष्ट्रएक लाखाची पैज पडली महागात

एक लाखाची पैज पडली महागात

Subscribe

निवडणुकीला कोण जिंकणार? यावरुन लावलेली एक लाखाची पैज दोन विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांना चांगलीच महागात पडली आहे. या दोन्ही कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

निवडणूक कोण जिंकणार? यावरुन एक लाखाची पैज लावणं दोन विविध पक्षांच्या समर्थकांना चांगलच महागात पडलं आहे. या दोन्ही समर्थकांच्या विरोधात सांगली जिल्ह्यातील मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. त्याचबरोबर जुगार अधिनियमानुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राजकुमार लहू कोरे आणि रणजित लालासाहेब देसाई असं या दोन्ही समर्थकांची नावं आहेत. राजकुमार हे भाजप समर्थक आहेत, तर रणजीत हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समर्थक आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

सांगली मतदार संघात २३ एप्रिल रोजी मतदान झाले. २३ मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत कोण जिंकणार? यावर संपूर्ण मतदार संघात चर्चा सुरु आहे. प्रत्येक नाक्यावर, चहाच्या टपरीवर, गल्ली-गल्लीत यासंदर्भात चर्चा लागल्या आहेत. या निवडणुकीत भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यात अटीतटीची लढत होणार आहे. या निवडणुकीत कोण जिंकणार? याची उत्सुकता मतदार संघातील नागरिकांच्या शिगेला पोहोचली आहे. मतदार संघातील काही जण तर यावर पैज लावत आहेत. अशीच एक पैज राजकुमार कोरे आणि रणजित देसाई यांनी लावली. ही पैज त्यांनी एक लाखांची लावली. ते यावरच थांबले नाहीत, तर या पैजसाठी त्यांनी कायदेशीरपणे नोटरी केली. या शिवाय दोघांनी एकमेकांना निकाला नंतरच्या तारखेचे १ लाख रुपयांचे चेकही देऊन टाकले. स्वत:च्या फायद्यासाठी नोटरी केल्याने पोलीस हवालदार चंद्रकांत वाघ यांनी दोघांच्या विरोधात पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यामुळे जुगार अधिनियमानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -