घरदेश-विदेशएनआयएचे देशभरात ४ ठिकाणी छापे; वर्ध्यातून एका महिलेला अटक

एनआयएचे देशभरात ४ ठिकाणी छापे; वर्ध्यातून एका महिलेला अटक

Subscribe

शनिवारी सकाळी छापे टाकण्यात आले आहे. छापे टाकत एनआयएच्या पथकाने या चारही ठिकाणी छाडाछडती सुरु केली आहे.

एनआयए म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेने देशभरामध्ये ४ ठिकाणी छापे टाकले आहेत. आयएसआय या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरुन या चार ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. हैद्राबादमधील तीन ठिकाणी तर महाराष्ट्रातील वर्ध्यातील एका ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे. वर्ध्यात एका महिलेला एनआयएने अटक केली आहे.

- Advertisement -

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयएसआय या दहशतवादी संघटनेशई संबंधित असल्याच्या संशयावरुन एएनआयच्या पथकाने हैद्राबाद आणि वर्ध्यामध्ये छापे टाकले. शनिवारी सकाळी छापे टाकण्यात आले आहे. छापे टाकत एनआयएच्या पथकाने या चारही ठिकाणी छाडाछडती सुरु केली आहे. हैद्राबादच्या तीन ठिकाणी तपास सुरु आहे तर वर्ध्यात छापा टाकून एका महिलेला एनआयएने अटक केली आहे.

- Advertisement -

वर्धा येथील मसाळा परिसरातून एनआयएच्या पथकाने एका महिलेला अटक केली आहे. या महिलेला का अटक करण्याता आली आहे. तिच्याकडे नेमके काय सापडले, याबाबत माहिती समोर आलेली नाही. मात्र या कारवाईबाबत तपास यंत्रणेकडून कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -