घरमुंबईपोलिसाला शिवीगाळ करत कानशिलात लगावली; दोन तरुणांना अटक

पोलिसाला शिवीगाळ करत कानशिलात लगावली; दोन तरुणांना अटक

Subscribe

आरोपींकडे बाईकचे कागदपत्रे नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले नव्हते, त्यामुळे त्यांना दंड भरण्यास सांगण्यात आले. यावेळी या दोघांनी पोलिसांना शिवीगाळ करुन तक्रारदारांना जोरात कानशिलात लगावली.

पोलीस शिपायाला शिवीगाळ करुन कानशिलात लगावून सरकारी कामात अडथळा आणल्याचा प्रकार जोगेश्वरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच दोन्ही तरुणांना ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. नवीन अनिल डागीर आणि नितीन जयप्रकाश जागीड अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील तक्रारदार पोलीस शिपाई असून ते ओशिवरा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

अशी घडली घटना

गुरुवारी रात्री सहाय्यक फौजदार चोधरी, पोलीस शिपाई थोरात यांना जोगेश्वरी येथील एस. व्ही रोडवरील ए-1 दरबार हॉटेलजवळ नाकाबंदीचे आदेश देण्यात आले होते. रात्री उशिरा संबंधित पोलीस पथक वाहनांची तपासणी, विना हेल्मेट बाईकस्वाराविरुद्ध कारवाई करीत होते. याच दरम्यान त्यांना एक बाईकस्वार विनाहेल्मेट बाईक घेऊन येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलीस पथकाने त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र पोलिसांना पाहताच ते दोघेही युटर्न घेऊन पळू लागले. यावेळी पोलिसांनी पळून जाणार्‍या दोन्ही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे बाईकचे कागदपत्रे नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले नव्हते, त्यामुळे त्यांना दंड भरण्यास सांगण्यात आले. यावेळी या दोघांनी पोलिसांना शिवीगाळ करुन तक्रारदारांना जोरात कानशिलात लगावली.

- Advertisement -

दोन्ही आरोपींना अटक

दोघेही बाईकस्वार ऐवढ्यावर न थांबता त्यांनी पोलिसाच्या हातातील लाकडी काठी खेचून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार निदर्शनास येताच इतर पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. पोलीस शिपायाला शिवीगाळ करुन मारहाण करणे तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी या दोघांविरुद्ध तक्रार दाखल करुन पोलिसांनी गुन्हा नोंदविला. याच गुन्ह्यांत त्यांना शुक्रवारी सकाळी पोलिसांनी अटक केली. सध्या ते दोघेही २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. दोन्ही तरुण गोरेगाव येथील राममंदिर, आसमी कॉम्प्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -