घरदेश-विदेशNiranjan Hiranandani: हजारो कोटींची संपत्ती, तरीही मुंबईच्या 'या' उद्योगपतीने केला लोकल ट्रेनने...

Niranjan Hiranandani: हजारो कोटींची संपत्ती, तरीही मुंबईच्या ‘या’ उद्योगपतीने केला लोकल ट्रेनने प्रवास

Subscribe

हिरानंदानी ग्रुपचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये ते मुंबई लोकलमधून प्रवास करातना दिसत आहेत.

मुंबई: अब्जाधीशांच्या लक्झरी लाइफस्टाइलबद्दल तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या असतील. कोट्यवधींची संपत्ती असलेल्या श्रीमंत लोकांकडे महागडे खाजगी जेट आणि जगातील सर्वात महागड्या गाड्या असणं सामान्य आहे. परंतु हजारो कोटींची संपत्ती असूनही रिअल इस्टेट क्षेत्रातील नामवंत बिझनेस टायकून निरंजन हिरानंदानी यांनी लोकल ट्रेनने प्रवास केला आहे. (Niranjan Hiranandani Wealth worth thousands of crores yet Niranjan Hiranandani Mumbai businessman travels by local train)

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

हिरानंदानी ग्रुपचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये ते मुंबई लोकलमधून प्रवास करातना दिसत आहेत. हिरानंदानी मुंबई लोकलने उल्हासनगर येथील त्यांच्या कार्यालयात जात होते, त्यावेळचा त्यांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

- Advertisement -

हिरानंदानी यांची संपत्ती किती

हिरानंदानी यांना मुंबई लोकलमधून प्रवास करताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हिरानंदानींबद्दल बोलायचे झाले तर त्यांची गणना देशातील अव्वल श्रीमंतांमध्ये केली जाते. 2023 च्या हुरुन यादीनुसार, निरंजन हिरानंदानी हे भारतातील 50 सर्वात श्रीमंत लोकांमध्ये होते. त्यांची एकूण संपत्ती 32 हजार कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्‍यांच्‍याकडे आलिशान कारचे कलेक्‍शनही आहे.

एखाद्या व्यक्तीकडे हजारो कोटी रुपयांची अफाट संपत्ती असेल, महागड्या गाड्यांचा अप्रतिम कलेक्शन असेल आणि तरीही ऑफिसला जाण्यासाठी मुंबई लोकलने प्रवास केला तर लोकांना आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. हिरानंदानी यांच्या प्रवासाचे कारण म्हणजे मुंबईचं ट्र‌ॅफिक ज‌ॅम. अनेक वेळा रस्त्यावर अडकून अनेक तास वाया गेल्याने लोकांचा वेळ वाया जातो. अशा स्थितीत हिरानंदानी यांनी वेळ वाचवण्यासाठी मुंबई लोकलने प्रवास केला.

- Advertisement -

हिरानंदानी यांनी सांगितला अनुभव

हिरानंदानी यांनी त्यांच्या या प्रवासाविषयी सांगितलं आहे. इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना त्यांनी हा अनुभव अभ्यासपूर्ण असल्याचे सांगितले. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिलं की, वेळेची बचत करत आणि ट्रॅफिकला टाळत मुंबई ते उल्हासनगर असा एसी कोचमधून प्रवास करणे हा एक अभ्यासपूर्ण वैयक्तिक अनुभव होता.

मुंबईचं ट्रॅफिक टाळण्यासाठी लाखो लोक दरवर्षी मुंबई लोकलने त्यांच्या कार्यालयात जातात. याच कारणामुळे मुंबई लोकलला लाइफलाइन म्हटले जाते.

(हेही वाचा: ISRO: 2024 वर्षात गगनयानसह डझनभर मोहिमा राबविण्याची तयारी; ISRO अध्यक्षांनी सांगितला प्लॅन )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -