घरक्राइमIIT BHU : अटकेच्या भीतीने मध्य प्रदेशात प्रचाराला गेलो; बलात्कार प्रकरणातील आरोपींनी...

IIT BHU : अटकेच्या भीतीने मध्य प्रदेशात प्रचाराला गेलो; बलात्कार प्रकरणातील आरोपींनी सांगितला घटनाक्रम

Subscribe

वाराणसी : 1 नोव्हेंबरच्या रात्री IIT BHU मध्ये तीन तरुणांनी बंदुकीच्या धाकावर एका विद्यार्थिनीला कपडे उतरवण्यास भाग पाडले. यानंतर तरुणांनी तिचे चुंबन घेत सामूहिक बलात्कार करत व्हिडिओही बनवला होता. या घटनेचे संतप्त पडसाद उमटल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी पोलिसांनी आयआयटी बीएचयूच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. यानंतर पोलिसांच्या चौकशीत तिन्ही आरोपींनी 1 नोव्हेंबरच्या रात्री घडलेला घटनाक्रम सांगितला आहे. (IIT BHU Went campaigning in Madhya Pradesh fearing arrest The sequence of events narrated by the accused in the rape case)

पोलिसानी सांगितले की, बीएचयूच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यापूर्वी आरोपी कुणाल पांडे हा त्याचे मित्र अभिषेक चौहान उर्फ ​​आनंद आणि सक्षम पटेल यांच्यासोबत 1 नोव्हेंबरच्या रात्री बाईकवरून चेतगंजच्या नक्कटय्या जत्रेला गेले होते. यावेळी त्यांनी तिथे दारू प्यायली. नक्कटय्या जत्रा पाहून तिन्ही आरोपी सिंग गेटमार्गे बीएचयू कॅम्पसमध्ये दाखल झाले आणि आयआयटीच्या दिशेने जात होते. यावेळी रस्त्यावर कोणी नसल्याचे पाहून तिघांनी बीटेकच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर हैदराबाद गेट सोडून ते बायपासच्या दिशेने गेले. जवळपास अर्धा तास तिघेही बायपासवर थांबले. यानंतर आरोपी कुणालने सक्षम आणि अभिषेकला त्यांच्या घरी सोडले आणि दुसऱ्या दिवशी दुपारी अडीचनंतर तो स्वत:च्या घरी पोहोचला.

- Advertisement -

हेही वाचा – ISRO: 2024 वर्षात गगनयानसह डझनभर मोहिमा राबविण्याची तयारी; ISRO अध्यक्षांनी सांगितला प्लॅन

शहर सोडत मध्य प्रदेशात निवडणुकीचा प्रचार केला

पोलिसांच्या चौकशीत तिन्ही आरोपींनी 1 नोव्हेंबरच्या रात्री गुन्हा केल्याचे कबूल केले. यानंतर 2 आणि 3 नोव्हेंबरच्या रात्री विद्यार्थीनीवरील बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ आयआयटी बीएचयूच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्यास सुरूवात केली. त्यामुळे तिन्ही आरोपी घाबरले आणि त्यांनी शहर सोडत थेट मध्य प्रदेश गाठले. त्याठिकाणी त्यांनी विधानसभा निवडणुकीचा प्रचार केला. मतदानापूर्वी तिघेही शहरात परत आले आणि छुप्या पद्धतीने राहू लागले. त्यांना आता अटक होऊ शकत नाही, असा विश्वास होता.

- Advertisement -

सीसीटीव्ही फुटेजवरून पटली तिन्ही आरोपींची ओळख 

उच्चपदस्थ पोलिसांनी सांगितले की, 300 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन केल्यानंतर अखेर 4 नोव्हेंबर रोजी तिन्ही आरोपींची ओळख पटली. गुन्हा केल्यानंतर तिन्ही आरोपी हैदराबाद गेटपासून बायपासच्या दिशेने पळून गेले होते, मात्र रस्त्यावरील दुसऱ्या बाजूला दिवाबत्तीची विशेष व्यवस्था नसल्याने आरोपींना शोधण्यास यश मिळाले नाही. परंतु 1 नोव्हेंबरला मध्यरात्री 1 वाजल्यानंतर सिंग गेट येथून बीएचयूमध्ये प्रवेश करणाऱ्या दुचाकीवर तीन तरुण प्रवास करत असल्याचे फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सिग्रा येथे स्थित सिटी कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या मदतीने, पोलिसांना तीन तरुण बुलेट बाईक चालवत असल्याचे अस्पष्ट फुटेज मिळाले. या फुटेजच्या मदतीने पोलीस लंकेच्या दिशेने निघाले आणि चेतगंज गाठले. चेतगंज परिसरात तीन आरोपींचे स्पष्ट फुटेज मिळाले. पीडितेला फुटेज दाखवले असता तिने तिघांनाही ओळखले.

हेही वाचा – JN.1 variant : Covid च्या नव्या व्हेरियंटमुळे खळबळ, गेल्या 24 तासांत देशांत कोरोनाच्या 800 पेक्षा अधिक रूग्णांची नोंद

काय आहे प्रकरण?

IIT BHU मधील गणित अभियांत्रिकी विभागातील बीटेकची विद्यार्थिनी 1 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास न्यू गर्ल्स हॉस्टेलमधून फिरायला निघाली होती. ती कॅम्पसमधील गांधी स्मृती वसतिगृह चौकात पोहोचली, तेव्हा तिला तिची मित्र तिथे दिसला. याचवेळी करमण वीर बाबा मंदिराजवळ मागून बुलेटवर तीन तरुण आले आणि पीडित मुलीसह तिच्या मित्राचा रस्ता अडवला. पीडित विद्यार्थिनीने लंका पोलीस ठाण्यात दिलेल्या एफआयआरमध्ये म्हटले की, माझा मित्र काही वेळाने निघून गेल्यानंतर आरोपींनी पुन्हा एकदा माझा रस्ता अडवला आणि गळफास लावून एका कोपऱ्यात नेले. आधी किस केले, नंतर कपडे काढत व्हिडिओ बनवला, फोटो काढले आणि बलात्कार केला. यानंतर मी आरडाओरडा केल्यावर त्या तरुणांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. तरुणांनी माझा फोन घेतला, 10 ते 15 मिनिटे मला अडवून ठेवले आणि यानंतर ते मला सोडून निघून गेले. दरम्यान, पीडित विद्यार्थींनीवरील बलात्काराच्या निषेधार्थ संपूर्ण कॅम्पस बंद ठेवला होता. वर्गखोल्या आणि प्रयोगशाळेतील संशोधनाचे कामही बंद होते. याशिवाय संपूर्ण कॅम्पसची इंटरनेट सेवाही बंद होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -