घरताज्या घडामोडीतुरुंगात माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला- निर्भया प्रकरणातील दोषीचा आरोप

तुरुंगात माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला- निर्भया प्रकरणातील दोषीचा आरोप

Subscribe

निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याने तुरुंगात त्याच्यावर  लैंगिक  अत्याचार झाल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी मुकेश याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत मुकेश याच्यावर अत्याचार होत असताना तुरुंगाधिकारी तेथे उपस्थित होते. पण त्यांनी त्याची मदत केली नाही. त्याला रुग्णालयातही नेण्यात आले नाही. पण नंतर त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला दीन दयाल उपाध्याय रुग्णालयात नेण्यात आले. पण तो वैद्यकीय अहवाल अद्याप मिळालेला नाही. असेही मुकेश याच्या वकील अंजली प्रकाश यांनी न्यायालयाला सांगितले.

तसेच मुकेश याचा भाऊ राम सिंह याची तुरुंगात हत्या करण्यात आली. पण ती आत्महत्या असल्याचे तुरुंगाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. राम याचा एक हात निकामी होता. त्यामुळे तो गळफास लावून आत्महत्या कशी करू शकतो. असा सवालही प्रकाश यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. दरम्यान, याप्रकरणी  एफआयआर दाखल करायची होती. असेही मुकेश याच्यातर्फे वकील अंजली प्रकाश यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर क्युरेटीव्ह याचिका फेटाळण्या आधीच मुकेशला वेगळ्या कारागृहात ठेवण्यात आले होते. असा आरोपही प्रकाश यांनी तुरुंग प्रशासनावर केला आहे.

एक प्रतिक्रिया

  1. अरे यांचं इतकं ऐकून घेण्यापेक्षा लटकवा ना एकदम. नाहीतर उगाच डोकं खात बसतील सगळ्यांचं. मोहन देवळे. कांजूरमार्ग मुंबई.

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -