घरदेश-विदेशआता लहान मुलांनाही बाईकवर हेल्मेटसक्ती, वेगावरही नियंत्रण, नेमके नियम काय?

आता लहान मुलांनाही बाईकवर हेल्मेटसक्ती, वेगावरही नियंत्रण, नेमके नियम काय?

Subscribe

अधिसूचनेनुसार, नवीन नियम 15 फेब्रुवारी 2023 (MoRTH नवीन नियम) पासून लागू होतील. सुरक्षेची कोणतीही उपाययोजना न करता लोक मोटारसायकल किंवा स्कूटरवर मुलांना घेऊन जातात, असे अनेकदा दिसून आले. सोशल मीडियावर अशी छायाचित्रे देखील आहेत, ज्यामध्ये एकाच बाईकवर 5-10 मुले बसलेली आहेत, परंतु त्यांच्या सुरक्षेचा हा मोठा गोंधळ आहे, ज्यामुळे परिवहन मंत्रालयाने नवीन नियम केलेत.

नवी दिल्ली : परिवहन मंत्रालयाने आता दुचाकीवरून जाणाऱ्या लहान मुलांनाही हेल्मेट सक्तीचे केलेय. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 4 वर्षांखालील कोणताही मुलगा दुचाकी चालवत असेल, तर त्याला क्रॅश हेल्मेट घालणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर रस्ते सुरक्षा नियम लागू केले जात आहेत. अधिसूचनेनुसार, नवीन नियम 15 फेब्रुवारी 2023 (MoRTH नवीन नियम) पासून लागू होतील. सुरक्षेची कोणतीही उपाययोजना न करता लोक मोटारसायकल किंवा स्कूटरवर मुलांना घेऊन जातात, असे अनेकदा दिसून आले. सोशल मीडियावर अशी छायाचित्रे देखील आहेत, ज्यामध्ये एकाच बाईकवर 5-10 मुले बसलेली आहेत, परंतु त्यांच्या सुरक्षेचा हा मोठा गोंधळ आहे, ज्यामुळे परिवहन मंत्रालयाने नवीन नियम केलेत.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 15 फेब्रुवारी 2022 ला जारी केलेल्या अधिसूचनेच्या माध्यमातून सीएमव्हीहीआर, 1989 च्या नियम 138 मध्ये सुधारणा केली असून, त्यानुसार चार वर्षांखालील मुलांना घेऊन दुचाकीवर मागे बसवून नेणे किंवा त्यांना दुचाकीवरून नेण्यासाठी केलेल्या सुरक्षा उपाययोजनांशी संबंधित नियम निर्धारित केलेत. मोटार वाहन कायद्याच्या कलम 129 अंतर्गत हे नियम अधिसूचित  करण्यात आलेत, ज्यामध्ये केंद्र सरकार नियमांनुसार, चार वर्षांखालील मुलांना दुचाकीवर मागे बसवून नेणे किंवा त्यांना दुचाकीवरून नेण्यासाठी मुलांच्या सुरक्षेसाठी काही उपाययोजना करू शकते. या नियमांमध्ये सुरक्षा सामग्री आणि मजबूत हेल्मेटचा वापर त्याचप्रमाणे अशा दुचाकीचा वेग 40 किमी प्रतितासापर्यंत मर्यादित असावा हे नमूद करण्यात आले.

- Advertisement -

नवीन नियमावलीत काय?

1- क्रॅश हेल्मेट आवश्यक

4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी दुचाकी वाहन चालवताना क्रॅश हेल्मेट घालणे आवश्यक आहे. क्रॅश हेल्मेट हे हेल्मेट असतात, ज्यात संपूर्ण डोके झाकलेले असते, फक्त टोपी म्हणून परिधान केलेले हेल्मेट नाही. हे नवीन नियम लागू झाल्यानंतर भारतदेखील निवडक देशांमध्ये सामील झालाय, जेथे वयोमानानुसार सुरक्षा उपाय आहेत आणि लहान मुलांसाठीही सुरक्षिततेचे उपाय आहेत.

2- सुरक्षा हार्नेसदेखील आवश्यक

बाईक चालवणाऱ्या व्यक्तीच्या मागे जर मूल बसले असेल तर त्याच्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था असणे आवश्यक आहे. या अंतर्गत मुलासाठी सुरक्षा हार्नेस असावा, जेणेकरून मूल मागून पडू नये. सुरक्षा हार्नेस मुलांना रायडरशी जोडून ठेवते आणि 30 किलो वजन उचलू शकते. त्यामुळे तुम्हीही तुमच्या लहान मुलाला बाईकवर घेऊन कुठेतरी जात असाल तर नियमांची काळजी घ्या.

- Advertisement -


3- वेगावर आवर घाला

ज्या दुचाकीवर 4 वर्षांपेक्षा लहान मूल बसलेले असेल, त्याचा वेग ताशी 40 किलोमीटरपेक्षा जास्त नसावा, असेही सांगण्यात आले. जर वेग जास्त असेल तर हेल्मेट घातले तरी मुलाला पडताना दुखापत होऊ शकते. एवढेच नाही तर सेफ्टी हार्नेस असूनही भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीवरून पडल्याने लहान बालक गंभीर जखमी होऊ शकते, त्यामुळे वेगावरही मर्यादा घालण्यात आल्यात.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -