घरताज्या घडामोडीआता जुन्या सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीवरही GST लागणार!

आता जुन्या सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीवरही GST लागणार!

Subscribe

या कोरोनाच्या काळात सोन्याच्या भावात दररोज वाढ होताना दिसत आहे. दिवसेंदिवस वाढत गेलेले सोन्याच्या भावाने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. या काळात सोनं खरेदीचा विचारही सर्वसामान्य करत नाहीयेत. अशातच आता जुन्या सोन्याचे किंवा सोन्याचे दागिने विकल्यावरही तुम्हाला तीन टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. अशी माहिती केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी दिली.

जीएसटीच्या पुढील परिषदेत यावर निर्णय घेण्यात येणार आहे. याचा अर्थ असा की जरी लोकांनी जुने दागिने विकले तरी त्यांना हवातसा नफा होणार नाही. थॉमस इसाक म्हणाले की, नुकतीच राज्याच्या अर्थमंत्र्यांची (जीओएम) जुन्या सोन्या-दागिन्यांच्या विक्रीवर तीन टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) लावण्याच्या प्रस्तावावर जवळपास सहमती झाली आहे.

- Advertisement -

वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, या मंत्र्यांमध्ये केरळ, बिहार, गुजरात, पंजाब, कर्नाटक आणि पश्चिम बंगालचे अर्थमंत्र्यांचा सहभाग होता. या सगळ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली.

ई बिल दुकानदारांना बंधनकारक

सोन्याच्या व दागिन्यांच्या दुकानदारांना प्रत्येक खरेदी-विक्रीसाठी ई-बिलं देणं बंधनकारक आहे. टॅक्स चोरी रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. तरीही छोट्या शहरांपासून मोठ्या शहरांमध्ये दुकानदार कित्येक ठिकाणी सोन्याची विक्री करून कच्ची बिलं देतात. आता या गोष्टींना आळा बसावा यासाठी ई बिलं अनिवार्य करण्यात आलं आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – स्वातंत्र्यदिनी देखील मिळाली नाही शववाहिका; मुलांनी सायकलवर नेला बापाचा मृतदेह


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -