घरCORONA UPDATEस्वातंत्र्यदिनी देखील मिळाली नाही शववाहिका; मुलांनी सायकलवर नेला बापाचा मृतदेह

स्वातंत्र्यदिनी देखील मिळाली नाही शववाहिका; मुलांनी सायकलवर नेला बापाचा मृतदेह

Subscribe

या कोरोनाच्या काळात रूग्णालयांवर आलेल्या ताणाचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. काही दिवसांमध्ये मुंबईत शववाहिका न मिळाल्यामुळे कुटुंबियांनी मृतदेह रिक्षेतून नेण्याची वेळ आली अशीच काहीशी घटना बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील एम.के.हुबळी या गावात ही घटना घडली आहे. शववाहिका न मिळाल्याने अंत्यसंस्कारासाठी मृतदेह सायकलवरून स्मशानात नेला,

एम के हुबळी गावातील सत्तर वर्षाच्या वृद्ध व्यक्तीची शनिवारी रात्री तब्येत बिघडली. पण वृद्धाला उपचारांसाठी दवाखान्यात नेण्यासाठी रूग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे वृद्धावर उपचार होऊ शकले नाहीत आणि घरातच त्याचा रात्री मृत्यू झाला. वृद्धाचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. पण त्या व्यक्तीच्या निधनानंतर गावकऱ्यांनी कोरोनाच्या भितीने आणि अफवेमुळे अंत्यसंस्काराला येण्यास नकार दिला. अगदी नातेवाईकांनीही अंत्ययात्रेत भाग घेण्यास नकार दिला. सकाळी वृद्ध व्यक्तीचा मृतदेह स्मशानात नेण्यासाठी शववाहिका किंवा अन्य वाहन देखील मिळाले नाही. त्यामुळे मृत वृद्धाच्या कुटुंबीयांनी सायकलवरुन मृतदेह स्मशानात नेण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

सायकलवरून नेला मृतदेह

सायकलवरून स्मशानात मृतदेह नेताना पाहून ग्रामस्थ अवाक झाले. जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला रुग्णवाहिका, शववाहिका उपलब्ध होणे देखील अवघड झाले आहे.

या आधी बेळगाव जिल्ह्यात अशीच काहीशी घटना घडली होती. अथणी गावात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. कोरोनाने मृत्यू झाला असावा अश्या भीती गावातील लोक, नातेवाईक मृतदेहाजवळही आले नाहीत. शेवटी मृत पतीच्या पत्नीने स्मशानात मृतदेह नेण्यासाठी हातगाडीची व्यवस्था केली. नंतर हातगाडीवर मृतदेह ठेवून मृतदेह स्मशानात नेण्यात आला.

- Advertisement -

हे ही वाचा – दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -