घरटेक-वेकमोबाईल नेटवर्क पोर्ट करा फक्त 'दोन' दिवसात

मोबाईल नेटवर्क पोर्ट करा फक्त ‘दोन’ दिवसात

Subscribe

एका नेटवर्कमधून दुसऱ्या नेटवर्कमध्ये जाताना या आधी साधारण ७ दिवसांचा कालावधी लागत होता. पण आता ग्राहकांना पोर्टिंगचा लाभ झटपट घेता यावा, यासाठी काही बदल करण्यात आले आहे.

मोबाईल नंबर न बदलता दुसऱ्या नेटवर्कमध्ये नंबर पोर्ट करण्यासाठी साधारण आठवडा लागतो. पण आता ही प्रक्रिया केवळ दोन दिवसात होणार आहे. ट्रायने मोबाईल नंबर पोर्टबलिटी संदर्भात नवे नियम आणले असून ग्राहकांना नंबर दुसऱ्या नेटवर्कमध्ये नंबर पोर्ट करताना कमी अडचणी येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे जर तुम्हाला मोबाईल नंबर दुसऱ्या नेटवर्कमध्ये पोर्ट करायचा असेल ही बातमी नक्की वाचा…

‘हा’ बदल केल्यामुळे पोर्टिंग होणार झटपट

एका नेटवर्कमधून दुसऱ्या नेटवर्कमध्ये जाताना या आधी साधारण ७ दिवसांचा कालावधी लागत होता. पण आता ग्राहकांना पोर्टिंगचा लाभ झटपट घेता यावा, यासाठी काही बदल करण्यात आले आहे. नेटवर्क बदल करण्यासाठी मिळणारा युनिक पोर्टिंग कोड (UPC) नेटवर्क बदलासाठी प्रोसेस करण्यासाठी वेळ कमी होणार आहे. पोर्टिंगची रिक्वेस्टसाठी मेसेज पाठवण्याची पद्धत देखील सोपी होणार असल्याचे ट्रायकडून सांगण्यात आले आहे. शिवाय त्यानंतर जुन्या नेटवर्क ते नवा नेटवर्क असा परवानगीसाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. हे करत असताना या पूर्वी UPC ची वैधता ही कमी होणार आहे. पूर्वी हा कोड १५ दिवसांसाठी वैध असायचा पण आता तो फक्त ४ दिवसांसाठी वैध असेल. ही अट जम्मू काश्मीर, आसाम आणि काही राज्यांसाठी वगळण्यात आली आहे.

- Advertisement -
वाचा- ‘OnePlus’ च्या नव्या फोनमध्ये 5G इंटरनेट

एकावेळी १०० नंबर होणार पोर्ट

अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना वेगळे मोबाईल क्रमांक देत असतात. जर एखाद्या कंपनीला आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे मोबाईल नेटवर्क बदलायचे असेल. तर त्यासाठी लागणारा वेळही ४ दिवसांचा करण्यात आला आहे. शिवाय यापूर्वी एकावेळी ५० जणांचे नेटवर्क बदलता येऊ शकत होते. पण आता हा आकडा १०० इतका करण्यात आला आहे.

 हे माहीत आहे का? –गुगलनंतर व्हॉट्सअॅपही फेक न्यूज विरोधात

परवानगीमुळे लागायचा वेळ

यापूर्वी पोर्टिंग करण्यासाठी आठवडा लागायचा कारण पोर्टिंग रिक्वेस्ट पाठवल्यानंतर ज्या क्रमांकामध्ये पोर्ट करायचे आहे त्या कंपनीकडे परवानगी मागताना वेळ लागायचा. त्या नंबरचे काही ड्युज आणि बदलाचे कारण त्या ग्राहकाकडून जाणून घेण्यासाठी वेळ लागायचा. काही गोष्टी रिअल टाईममध्ये होत नव्हत्या त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला फार वेळ जायचा. पण आता बऱ्याच गोष्टी रिअल टाईममध्ये होणार आहे, असे ट्रायकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -