घरCORONA UPDATEOmicron China Connection: ओमिक्रॉन विषाणूचे चीन कनेक्शन; WHO ने विषाणूचे नाव असेच...

Omicron China Connection: ओमिक्रॉन विषाणूचे चीन कनेक्शन; WHO ने विषाणूचे नाव असेच का ठेवले?

Subscribe

कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या विषाणूचे आत्तापर्यंत जगातील १० देशांमध्ये रुग्ण आढळून आले आहेत. परंतु भारतात अजूनही या विषाणूचा एकही रुग्ण आढळून आला नसला तरी धोका मोठ्याप्रमाणात वाढला आहे. ओमिक्रॉन स्ट्रेन डेल्टा स्ट्रेनपेक्षा ७ पटीने अधिक वेगाने पसरतोय. त्यामुळे सर्वाधिक लोकांना हा विषाणू बाधित करु शकतो अशी चिंता व्यक्त होतेय. अशातच ओमिक्रॉन विषाणूचे चीन कनेक्शन समोर आले आहे. तर WHO ने देखील ओमिक्रॉन विषाणूला धोकादायक असल्याचे म्हणत विषाणूचे ओमिक्रॉन असे नाव का ठेवले याचा खुलासा केला आहे.

दरम्यान कोरोनाच्या सुरुवातीपासूनचं WHO वर चीनच्या दबावाखाली काम करत असल्याचे आरोप लावण्यात आले होते. अमेरिकेसह युरोपीय देशांनीही WHO वर चीनच्या बाजूने नेहमी बोलते असे आरोप केले. WHO कोरोनाच्या प्रत्येक व्हेरियंटला ग्रीक वर्णमालेप्रमाणे नामकरण करते. यात ओमिक्रॉन हे ग्रीक वर्णमालेतील १५ वे अक्षर आहे. मात्र WHO ने यापूर्वी वर्णमालेत १५ व्या अक्षराआधी येणाऱ्या २ अक्षरांपासून कोणत्याही व्हेरियंटचे नाव ठेवलेले नाही. जेव्हा या नव्या विषाणूचे नाव ठेवण्याची वेळ आली तेव्हाही WHO ने ग्रीक वर्णमालेच्या १५ वे अक्षर ओमिक्रॉन हे निवडले. परंतु तुम्हाला माहिती आहे का WHO ने जाणूनबुजून व्हेरिएंटचे नामकरण करताना दोन अक्षरं का सोडली?

- Advertisement -

१) ग्रीक वर्णमालेतील १३ वे अक्षर- NU(V)

२) ग्रीक वर्णमालेतील १४ वे अक्षर – शी (XI)

- Advertisement -

३) यातही आधीची दोन अक्षरं सोडून दिली आहेत.

४) NU हे अक्षर उच्चारण्यास अडचण येईल आणि नावावरून गोंधळ होईल म्हणून सोडून देण्यात आले.

५) मात्र १४ वे अक्षर शी (XI) सोडल्याने वाद निर्माण झाला.

का शी (XI) हे अक्षर गाळण्यात आले?

WHO ने आत्तापर्यंत कोरोनाच्या १३ व्हेरिएंटचे नामकरण केले आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील मेडिसिन विभागाचे प्रोफेसर मार्टिन कुलडॉर्फ यांनी या मागची संभाव्या कारणं सांगितली आहेत. ते म्हणाले की, WHO ने दोन अक्षरं वगळली आणि नव्या व्हेरियंटला ओमिक्रॉन असे नाव दिले, जेणेकरुन कोरोना व्हेरियंटला ‘शी’ व्हेरियंट म्हणावे लागणार नाही. कारण चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नावाचे पहिले अक्षर शी असे आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नावाशी साम्य असल्याने, XI (शी) अक्षर सोडल्यानंतर सोशल मीडियावर ट्रेंड सुरू झाला की WHO व्हायरसचे नाव देण्यासही चीनला घाबरत आहे. जगभरातून होणारी टीका पाहता WHO च्या प्रवक्त्याने स्पष्ट केले की, XI ( शी) अक्षर सोडले कारण ते एक सामान्य आडनाव आहे.

दरम्यान कोरोनाच्या सुरुवातीपासून झालेल्या संशोधनातून दिसून आले की, कोरोना विषाणूची उत्पत्ती चीनमधून झाली आहे. त्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनवर सतत टीका करत होते. तसेच चीनच्या प्रयोगशाळेत त्याची चौकशी करायची अशी मागणी सतत करत राहिले. याशिवाय WHO चीनचे समर्थन करत असून चीनला ते घाबरतात असे आरोप अनेक देशांनी केले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -