घरताज्या घडामोडीपरमबीर सिंह - सचिन वाझे आमनेसामने, घडला काही सेकंदांचा संवाद

परमबीर सिंह – सचिन वाझे आमनेसामने, घडला काही सेकंदांचा संवाद

Subscribe

जामीनपात्र वॉरंट आयोगाने रद्द करतानाच १५ हजारांचा ठोठावला दंड

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह हे आज सोमवारी चांदीवाल आयोगाच्या कार्यालयात आले. चांदीवाल आयोगासमोर हजर राहण्याची माहिती सिंह यांच्या वकिलांकडून याआधीच देण्यात आली होती. चांदीवाल आयोगाकडून जामीनपात्र वॉरंट जाहीर झाल्यानंतर आज त्यांनी हजेरी लावली. पण आजच्या दिवशी चर्चा झाली ती म्हणजे सचिन वाझे आणि परबीरसिंह यांच्या संवादाची. याठिकाणी आयोगासमोर हजर राहण्याआधी सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्यात काही सेकंदाचा संवाद झाला. तब्बल आठ महिन्यांनंतर हे दोघे एकमेकांसमोर आले. पण यावेळी दोघांमध्ये झालेल्या संवादामुळे सगळ्यांचे लक्ष वेधले. (parambir singh chat with sachin waze for few seconds during chadiwal commission hearing)

- Advertisement -

 

परमबीर सिंह आज चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. यावेळी चांदीवाल आयोगाने परमबीर सिंह यांचा जामीनपात्र वॉरंट रद्द केले. त्याचवेळी परमबीर सिंह यांना १५ हजार रूपयांचा दंडही ठोठावला. परमबीर सिंह यांना ही दंडाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये भरण्याच्या सूचना चांदीवाल आयोगाने दिल्या आहेत. परमबीर सिंह यांच्याविरोधात झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत एक समिती नेमली होती. या समितीने वारंवार समन्स पाठवूनही परमबीर सिंह चौकशीसाठी हजर झाले नव्हते. या खंडणीवसुली प्रकऱणात निलंबित एपीआय सचिन वाझेची साक्ष आयोगाने याआधीच नोंदवली आहे. पण परमबीर सिंह यांची साक्ष नोंदवण्यासाठी आयोगाने त्यांना वारंवार समन्स बजावला होता.

- Advertisement -

एंटेलिया स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओच्या प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्येच्या प्रकरणात आरोपी असलेले एपीआय सचिन वाझे यांना आठ महिन्यांपूर्वी नॅशनल इनवेस्टीगेशन एजन्सीकडून अटक झाली होती. या अटकेनंतर
तब्बल 8 महिन्यांनंतर परमबीर सिंग आणि सचिन वाझे समोरासमोर आले आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात गोरेगाव येथील बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल झाली. याच प्रकरणात मुंबई क्राईम ब्रॅंचही तपास करत आहे. २३१ दिवसांनंतर मुंबईत हजर झालेल्या परमबीर सिंह यांनी युनिट ११ समोर ६ तास चौकशीला सामोरे गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परमबीर सिंह यांची ठाण्यातील नगर पोलिसांकडून चौकशी झाली. ठाण्याच्या न्यायालयानेही परमबीर सिंह यांच्याविरोधातील जामीनपात्र वॉरंट रद्द केले आहे. त्यापाठोपाठच चांदीवाल आयोगाकडून जारी करण्यात आलेले जामीनपात्र वॉरंटही आज रद्द करण्यात आले. परमबीर सिंह यांच्या वतीने वकील आज जामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल करणार असल्याचे कळते.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -