घरदेश-विदेशपंतप्रधान मोदींना परदेशात मिळाली १२ लाखांची गिफ्ट्स!

पंतप्रधान मोदींना परदेशात मिळाली १२ लाखांची गिफ्ट्स!

Subscribe

मोदींच्या विदेशी दौऱ्यांचा वारेमाप खर्च असेल किंवा मग ते जिथे जातील तिथल्या राष्ट्राध्यक्षांसोबत सेल्फी घेणं असुदे, त्यावरुन नेहमीच टीकेची झोड उठली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश वाऱ्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. गेल्या एका वर्षात पंतप्रधान मोदी यांना परदेश दौऱ्यांमधून सुमारे १२ लाख रुपये किमतीच्या १६८ भेटवस्तू मिळाल्याची माहिती समोर आली आहे. मोदींना मिळालेल्या या महागड्या भेटवस्तूंमध्ये फाउंटन पेन्स, मो ब्ला कंपनीचं रिस्ट वॉच, टी सेट, चिनी मातीची भांडी, मंदिर-मशिदींच्या प्रतिकृती, विष्णु-लक्ष्मीच्या मूर्ती, गणपतीच्या मूर्ती तसंच विवध पेटिंग्ज, गालीचे, बुलेट ट्रेनचं मॉडेल, फोटोफ्रेम्स, पुस्तकं आणि काचेचे व चांदीचे बाऊल्स आदी गोष्टींचा समावेश आहे. विदेश दौऱ्यांमध्ये मोदींना मिळालेल्या या महागड्या भेटवस्तूंची सध्या जोरदार चर्चा होत आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे विदेश दौरे आजवर नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहेत. मोदींच्या विदेशी दौऱ्यांचा वारेमाप खर्च असेल किंवा मग ते जिथे जातील तिथल्या राष्ट्राध्यक्षांसोबत सेल्फी घेण्याचं प्रकरण असुदे, त्यावरुन नेहमीच टीकेची झोड उठली आहे. त्यापाठोपाठ आता हा महागड्या गिफ्ट्सचा विषय सध्या चर्चेत आला आहे.

हेही वाचा : मोदी नावाच्या बासरीवाल्याचे स्वप्न

एका वर्षात २० परदेश दौरे

परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, जुलै २०१७ पासून ते जून २०१८ या काळात पंतप्रधान मोदी यांनी एकूण २० देशांचे दौरे केले. यामध्ये इस्राईल, जर्मनी, चीन, जार्डन, युएई, फलस्तीन, रूस, ओमान, स्विडन, लंडन, इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूरसह एकूण २० देशांचे दौरे केले आहेत. दरम्यान या दौऱ्यांदरम्यान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंपैकी दोन सर्वात महागड्या भेटवस्तूंची अधिक चर्चा आहे. त्यापैकी एक आहे रॉयल सेलेंगर लिमिटेड एडिशनची चांदीची पट्टी, ज्याची किंमत आहे तब्बल २ लाख १५ हजार रुपये. तर दुसरी आहे मशिदीची एक प्रतिकृती ज्याची किंमत जवळपास ५० हजार रुपये इतकी आहे. दरम्यान उपलब्ध माहितीनुसार, पंतप्रधान मोदींना मिळणाऱ्या या सर्व महागड्या भेटवस्तू सरकारी तिजोरीमध्ये जमा केल्या जातात.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -