घरदेश-विदेशमहाराष्ट्रानंतर गुजरातमध्येही वन रुपी क्लिनिक

महाराष्ट्रानंतर गुजरातमध्येही वन रुपी क्लिनिक

Subscribe

अहमदाबाद रेल्वे स्थानकात सुरू होणार क्लिनिक

मुंबईच्या अनेक स्थानकांवर सुरू केलेल्या वन रुपी क्लिनिकचा विस्तार होऊन लवकरच गुजरात येथील अहमदाबाद या स्थानकावर वन रुपी क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. रेल्वे अपघातात जखमी होणाऱ्या किंवा अचानक कोणत्याही पद्धतीचा त्रास जाणवू लागणाऱ्या रुग्णांना वन रुपी क्लिनिकमधून तत्काळ उपचार दिले जातात. मुंबईतील मध्य रेल्वेच्या २० स्थानकांवर वन रुपी क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्राबाहेरही वन रुपी क्लिनिकमधून सेवा देण्यात येणार आहे.

गुजरातमधील अहमदाबाद स्थानकावर क्लिनिक सुरू करण्यासाठी मागवलेल्या निविदा प्रक्रियेत एकमेव असलेल्या महाराष्ट्रातील मॅजिक डील या संस्थेचाही समावेश होता. या संस्थेला वन रुपी क्लिनिक सुरू करण्यासाठी मिळालेल्या ग्रीन सिग्नलमुळे अहमदाबाद या स्थानकात हे क्लिनिक सुरू करण्याचा मार्ग सोपा झाला आहे. त्यामुळे पुढच्या १५ दिवसात या स्थानकात वन रुपी क्लिनिक सुरू केले जाईल, अशी माहिती मॅजिक डिल या संस्थेचे संचालक डॉ. राहुल घुले यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नाशिकच्या करोना संशयित रुग्णाचे रिपोर्ट निगेटीव्ह


१५ दिवसात सुरू होणार क्लिनिक

निविदा प्रक्रियेत आता कोणत्याही प्रकारच्या अडचणी नसल्यामुळे येत्या १५ दिवसांमध्ये अहमदाबाद रेल्वे स्थानकात वन रुपी क्लिनिक सुरू केले जाणार आहे. शुक्रवारी मॅजिक डिल या संस्थेला क्लिनिक सुरू करण्याबाबतचे टेंडर मिळाले. त्यानुसार, लवकरात लवकर हे क्लिनिक सुरू होईल असेही डॉ. घुले यांनी स्पष्ट केले आहे.

२४ तास सुविधा

सध्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वन रुपी क्लिनिक आहेत. अशा २० हून अधिक क्लिनिकमध्ये गरजू रुग्णांना तत्काळ अहवाल काढून घेणे सोपं होत आहे. मध्य रेल्वेवर १३, पश्चिम रेल्वेवर सहा आणि हार्बरवरील एका स्थानकात हे क्लिनिक सुरू असून २४ तास सुविधा देण्यासाठी डॉक्टर्स या क्लिनिकमध्ये उपलब्ध असतात.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -