घरमुंबईजागतिक महिला दिनी केईएममध्ये फक्त महिला करणार रक्तदान

जागतिक महिला दिनी केईएममध्ये फक्त महिला करणार रक्तदान

Subscribe

महिला रक्तदानाची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे, ही संख्या वाढावी आणि फक्त महिलांकडून रक्तदान करुन घेण्याचा हेतू आहे.

जागतिक महिला दिनानिमित्ताने ८ मार्च रोजी केईएम या पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये फक्त महिलांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान करण्यामध्येही महिलांचाही उत्स्फुर्त प्रतिसाद वाढावा यासाठी जीवनदाता सामाजिक संस्था आणि केईएम रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर भरवण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराचा महिलांमध्ये जनजागृती आणि प्रोत्साहन देण्याचा हेतू असल्याचे संस्थेकडून सांगण्यात येत आहे.

कार्यक्रम, किटीपार्टी किंवा घरच्या कामातून महिलांना अनेकदा वेळ मिळत नाही. त्यातून, महिला रक्तदानाची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे, ही संख्या वाढावी आणि फक्त महिलांकडून रक्तदान करुन घेण्याचा हेतू आहे.  एखाद्या गरजू महिला रुग्णाला रक्त लागल्यास अशा उपक्रमातून देता येऊ शकते. तसेच रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमातून महिलांची संख्याही वाढावी यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनी रक्तदान शिबिर भरवण्यात आले असल्याचे जीवनदाता सामाजिक संस्थेकडून सांगण्यात आले आहे. एखाद्या महिलेने रक्तदानात सहभाग घेतला की तिचा आदर्श घेत कुटुंबातील इतर व्यक्तिही रक्तदान करु शकतात.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्रानंतर गुजरातमध्येही वन रुपी क्लिनिक


महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता, योग्य पोषण न मिळण्याच्या समस्या समोर येत होत्या आणि त्यामुळेच रक्तदानासाठी आलेल्या महिलांपैकी अनेक महिला रक्तदान करण्यास अपात्र ठरत असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. केईएम हॉस्पिटलमधील महिला, जीवनदाता संस्थांच्या पुढाकारानंतर अनेक रक्तदान संघटना, महिला ग्रुप, बचत गट यांनी रक्तदान करून जागतिक महिला दिन साजरा करण्याचे ठरवले आहे. महिलांसाठी असलेले हे आगळेवेगळे रक्तदान शिबिर केईएम हॉस्पिटलमध्ये भरवण्यात आले असून रविवारी ८ मार्च या जागतिक महिला दिनी सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू असणार आहे. त्यामुळे, महिला रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात येऊन रक्तदान करण्याचे आवाहनही संस्थेकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -