घरमुंबईफोर्ट येथे पुस्तकाच्या दुकानाला आग; ३० जणांची सुखरुप सुटका

फोर्ट येथे पुस्तकाच्या दुकानाला आग; ३० जणांची सुखरुप सुटका

Subscribe

अग्निशमन दलाने या आगीवर सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास नियंत्रण मिळवले

फोर्ट येथील सोमय्या इमारतीमधील पुस्तकाच्या दुकानाला बुधवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत हजारो किमती पुस्तके जळून खाक झाली. सुदैवाने अग्निशमन दलाने घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन या आगीवर वेळीच नियंत्रण मिळवले आणि आगीमुळे अडकलेल्या ३० व्यक्तींची सुखरूप सुटका केली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, फोर्ट, मुंबई हाऊस नजीक असलेल्या चार मजली इमारतीमधील एका पुस्तकाच्या दुकानाला बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता आग लागली. आगीचे निश्चित कारण समजले नाही. मात्र या ठिकाणी असलेल्या पुस्तकांची होळी झाली. आग लागल्याची घटना समजताच परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisement -

या इमारतीत ३० लोक अडकले होते. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून तातडीने संबंधित लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमन दलाने या आगीवर सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास नियंत्रण मिळवले. ही आग कशी लागली याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

डोंबिवलीच्या सोनारपाडा येथे गोदमाला आग

डोंबिवलीमध्ये सोनारपाडाजवळ एका भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी घडली आहे. आगीच्या ठिकाणी स्फोटांचे आवाज आल्यामुळे परिसर हादरून गेला आहे. आग विझवण्यासाठी कल्याण, अंबरनाथ नवी मुंबई येथून अग्निशमन दलाच्या गाड्या मागविण्यात आलेल्या असून सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आग नियंत्रणात आली आहे. सुदैवाने या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -