घरदेश-विदेशशोएब मलिकनंतर 'हा' क्रिकेटर होणार भारताचा जावई

शोएब मलिकनंतर ‘हा’ क्रिकेटर होणार भारताचा जावई

Subscribe

पाकिस्तानचा माजी कर्णधार क्रिकेटर शोएब मलिक पाठोपाठ आता आणखीन एक क्रिकेटपटू भारताचा जावई होणार आहे.

पाकिस्तानचा माजी कर्णधार क्रिकेटपटू शोएब मलिक याने भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाशी विवाह केला. त्यापाठोपाठ आता पाकिस्तानचा आणखीन एक क्रिकेटपटू भारताचा जावई होणार आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली भारतीय वंशाच्या शामिया आरझू हिच्याशी विवाह करणार असल्याची माहिती हसन अली याने दिली आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे हा विवाह दुबई मध्ये पार पडणार आहे.

कोण आहे शामिया?

शामियाने इंग्लंडमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. दुबईतील अमिरात एअरलाइन्स या कंपनीत शामिया फ्लाइट इंजिनियर पदावर कार्यरत आहे. मूळचे हरयाणाच्या मेवातचे असलेले शामियाचे कुटुंबीय सध्या दिल्लीत राहतात. शामिया आणि हसन अलीच्या कुटुंबियांना हा विवाह अत्यंत साध्या पद्धतीत पार पडावा अशी इच्छा होती. पण विवाहाचे वृत्त प्रसिद्धीमाध्यमांना कळल्याने या विवाहासंदर्भात अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत होते. त्यामुळे माध्यमांसमोर येऊन विवाहाबाबतीतील चर्चांना पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतल्याचे हसन अलीने सांगितले. दरम्यान शामिया आणि माझा विवाह २० ऑगस्ट रोजी होणार आहे, अशी माहितीसुद्धा हसन अलीने दिली.

- Advertisement -
pakistan pacer hasan ali will marry shamia arzoo on 20 august
हसन अली आणि शामिया आरझू

काय म्हणाले वधूचे वडील?

दरम्यान शामियाचे वडील लिकायत अली यांनी सुद्धा मुलीच्या लग्नाबाबत आपले मत मांडले. ते म्हणाले की, ”मुलीचे लग्न तर करायचे आहे. म्हणून मग मुलगा भारताचा असो किंवा पाकिस्तानचा, त्याने काय फरक पडतो? असा प्रश्न करत फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये गेलेल्या नातेवाईकांच्या आम्ही आजही संपर्कात आहोत, अशी माहिती शामियाचे वडील लियाकत अली यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -