घरदेश-विदेशकाश्मीरच्या तरुणांना भडकवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर

काश्मीरच्या तरुणांना भडकवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर

Subscribe

काश्मीर येथील शांती भंग करण्यासाठी पाकिस्तान सोशल मीडियाचा वापर करत आहे. यामुळे काश्मीरमध्ये भारतीय सैन्यावर हल्ले केले जात असल्याची माहिती कमांडर जनरल कमिशनर जनरल रणबीर सिंह यांनी दिली.

काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्यासाठी पाकिस्तान विविध मार्गांचा अवलंब करत आहे. येथील स्थानिक तरुणांचे मव वळवण्यासाठी पाकिस्तान आता सोशल मीडियाचा वापर करत आहे. भारतीय सैन्याचे कमांडर जनरल कमिशनर जनरल रणबीर सिंह यांनी ही माहिती दिली आहे. दहशतवाद पसवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर ही एक चिंताजनक गोष्ट असलायाचे ही ते यावेळी म्हणाले. पाकिस्तान अंतर्गत येणारे काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले नेहेमी होत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांच्या विचारात बदल करून काश्मीरमधल्या तरुणांना भडवल्या जात असल्याने येथील स्थानिक लोकही सैन्याची मदत करत नाही. यामुळे सैन्याला शांतता प्रस्तापित करण्यात यश येत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

काय म्हणालेत रणबीर सिंह

“पाकिस्तानकडून वाढता सोशल मीडियाचा वापर ही एक चिंतेची बाब आहे. पाकिस्तान आपल्या विभागात दहशतवाद वाढवत आहे. यामुळे या परिसरात शांती प्रस्तापित होऊ शकत नाही. ही फक्त भारता साठी नाही तर जगासाठी एक चिंतेची गोष्ट आहे.” – भारतीय सैन्याचे कमांडर जनरल कमिशनर जनरल रणबीर सिंह 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -