घरक्रीडाभारताने जिंकला दुसरा टी-२० सामना; मालिका बरोबरीत

भारताने जिंकला दुसरा टी-२० सामना; मालिका बरोबरीत

Subscribe

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या टी-२० सामन्याच्या मालिकेत भारताने आज बरोबरी साधली. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने १५९ धावांचे आव्हान उभे केले होते. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या धडाकेबाज अर्धशतकीय खेळीमुळे भारताचा विजय सोपा झाला. भारताने सात विकेट्स राखून हा सामना जिंकला. रोहितने यावेळी २९ चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर ५० रन्सची शानदार खेळी साकारली. या खेळीमुळे रोहित जागतिक स्तरावर टी-२० सामन्यात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.

सलामीवीर धवनने – ३०, रिषभ पंत – ४०, विजय शंकर – १४ आणि एमएस धोनीने २० धावांची खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. आता अंतिम सामना १० फेब्रुवारी रोजी हॅमिल्टन मैदानावर होणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ १-१ सामना जिंकून बरोबरीत आहेत. त्यामुळे शेवटचा सामना कोण जिंकतो याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

आजच्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलदांजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र न्यूझीलंडच्या फलंदाजाना मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले नाही. कॉलीन डी ग्रॅण्डहोमने ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. भारतीय गोलंदाजापैकी कृणाल पांड्याने २८ धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या तर खलील अहमदने २७ धावांच्या बदल्यात दोन विकेट्स घेतल्या. २० षटकात न्यूझीलंडने ८ विकेट्स गमावून १५८ धावा केल्या.

भारताला जिंकण्यासाठी १५९ धावांचे लक्ष्य होते. सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवनने भारताला चांगली सुरुवात करुन दिली. ऋषभ पंतने त्यांना सुरेख साथ दिली. यामुळेच भारताने १८.५ षटकातच १६२ धावा करत भारताने हा सामना खिषात घातला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -