घरदेश-विदेशपाकड्यांची नजर आता 'रुबी'वर!

पाकड्यांची नजर आता ‘रुबी’वर!

Subscribe

काश्मिरमधील पाणी आणि वन्य संपत्तीची नासधूस केल्यानंतर आता पाकिस्तानची नजर अमूल्य अशा दगडांवर पडली आहे. रूबी नावाच्या दगडाची लुक पाकिस्तानकडून केली जात आहे. काश्मिरमधील बहुमूल्य अशा खजिन्याचा वापर पाकिस्तानी लष्कर तेथील स्थानिकांमध्ये हिंसा निर्माण करण्यासाठी करत आहेत. पाकिस्तानी सेना आणि त्यांचे गुप्तहेर इसिसने या खाणींमधून स्थानिकांना बाहेर काढून चीनसोबत मिळून जागा बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. तेथील स्थानिक कमांडर यांना खाणींचा ठेका सोपवण्यात आला आहे.

गुलाम काश्मिरच्या नीलम घाटीपासून वरच्या भागात असलेल्या अलावा नांगीमाली आणि चिट्ठा काठा परिसरात हे अनमोल रूबी दगड आढळून येतात. गुलाम काश्मिरमध्ये अरबो रुपयांचा हा खनिजा दडून राहिला असल्याचे सांगितले जाते. फक्त चिट्ठा काठा परिसरातच साधारण ४५० किलो रूबी उपलब्ध असल्याचे समजते. गुलाम काश्मिरहून परतलेल्या इमरान मीर नावाच्या एका काश्मिरी युवकाने दैनिक जागरणला दिलेल्या माहितीनुसार, या खाणींवर ताबा मिळवत येथील स्थानिकांना इथून हटवण्याचा प्रयत्न होत आहे. यावर नियंत्रण ठेवणाऱ्यांनाही येथून बाजूला केले जात आहे. या अनमोल खजान्यावर पाकिस्तानी सेना आणि दहशतवादी कारवाया करणाऱ्या इसिसचे वर्चस्व आहे. या खाणींमध्ये सहा महिनेच खोदकाम होऊ शकते.

- Advertisement -

हा परिसर एलओसीपासून जवळ असल्याचे सांगत पाकिस्तानी सैनिक येथे स्थानिकांना काम करू देत नाहीत. पाकिस्तानी सैनिकांनी सहा महिन्यांपूर्वी काही चीनी लोकांना इथे बोलावले होते. त्यांनी या खाणींची पाहणी केली आणि त्यानंतर पाकिस्तानी सेना या खाणी बळकावण्याचा कट रचू लागले. चीनमधील एक कंपनीदेखील या कामात सहभागी असल्याचे समजते.

हेही वाचा –

३१ डिसेंबरपर्यंत नर्सरीसाठी तीन, पहिलीसाठी सहा वर्ष पूर्ण होणे बंधनकारक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -