घरताज्या घडामोडीLive Update: राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ११ लाख ६७ हजार ४९६

Live Update: राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ११ लाख ६७ हजार ४९६

Subscribe

राज्यात २१,६५६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११,६७,४९६ झाली आहे. राज्यात ३,००,८८७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ४०५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ३१७९१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७२ % एवढा आहे. (सविस्तर वृत्त)

- Advertisement -

एकीकडे राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असताना त्याचा शिरकाव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात देखील झालेला आहे. अशोक चव्हाण यांच्यापासून मंत्र्यांना कोरोनाची बाधा व्हायला सुरुवात झाली होती. नुकतेच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. मुश्रीफ यांनी स्वत: ट्वीट करून याबद्दलची माहिती दिली आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासांत ४३४ कोरोनाबाधित पोलीस आढळले असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २० हजार ८०१वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत २१२ पोलिसांचा मृत्यू झाला असून १६ हजार ७०६ पोलीस रिकव्हर झाले आहेत. तसेच सध्या ३ हजार ८८३ पोलिसांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस दलाने दिली आहे.


दादरच्या इंदूमिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकचा पायभरणी सोहळा आज दुपारी ३ वाजता होणार होता. पण आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकचा पायाभरणी सोहळा पुढे ढकलला आहे, असे एमएमआरडीए यांनी कळविले आहे.


४ सप्टेंबरला जयपूर-दुबईच्या विमानात कोरोना पॉझिटिव्ह प्रवासी आढळल्यानंतर एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांना दुबईमध्ये १५ दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. म्हणजेच २ ऑक्टोबरपर्यंत एअर इंडियाच्या विमानांना दुबईमध्ये परवानगी नाकारण्यात आली आहे. सविस्तर वाचा 


दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी कोसी रेल्वे मेगा पूल देशाला समर्पित करणार आहेत आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बिहारमधील नवीन रेल्वे मार्ग आणि विद्युतीकरण प्रकल्पांचे उद्घाटन करतील.


ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.


मुंबईतील वरळीतील Annie Besant रोड येथील मनीष कमर्शियल सेंटर येथे सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. सविस्तर वाचा 


कोरोना व्हायरस संबंधातील देशातील चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात ९६ हजार ४२४ नवे रुग्ण आढळले असून १ हजार १७४ रुग्णांचा एका दिवसात मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधित संख्या ५२ लाख १४ हजार ६७८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ८४ हजार ३७२ रुग्णांचा मृत्यू झाला असून ४१ लाख १२ हजार ५५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या १० लाख १७ हजार ७५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.


उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार पहाटे सहा वाजता पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यासाठी पोहोचले. यावेळीस संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनची पाहणी केली. स्टेनशवर तिकीट विक्री कशी असेल याचा ही अनुभव घेतला. एवढेच नाहीतर त्यांनी मेट्रोच्या रुळावर जाऊन काही अंतर प्रवास सुद्धा केला.


पुत्र प्राप्ती संबंधातील वादग्रस्त वादानंतर इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याप्रकरणी आज संगमनेर कोर्टात सुनावणी होणार आहे. पुत्र प्राप्तीसाठी सम-विषम फॉर्म्युलाबाबत इंदोरीकर महाराजांनी विधान केलं होतं.


दादरच्या इंदूमिल येथील आंबेडकर स्मारकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची आज पायाभरणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा पायाभरणी सोहळा पार पडणार आहे. आज दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आंबेडकर स्मारकातील आंबेडकर पुतळ्याचा पायाभरणी करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील विविध मंत्री उपस्थित राहणार असून यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोर पालन करण्यात येणार आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा हा राज्यातील पहिलाच सर्वात मोठा सोहळा असणार आहे. सविस्तर वाचा 


जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ३ कोटी पार झाला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेनुसार, आतापर्यंत जगात ३ कोटी ३ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ९ लाख ५० हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २ कोटी २० लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यात कोरोना प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. राज्यात दिवसाला २० हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधितांची वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी राज्यात २४ हजार ६१९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ४५ हजार ८४० झाली आहे. राज्यात ३ लाख १ हजार ७५२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात गुरुवारी ३९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ३१ हजार ३५१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७४ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -