घरदेश-विदेशपाकिस्तानी युवक भारताचे राष्ट्रगीत गातो तेव्हा

पाकिस्तानी युवक भारताचे राष्ट्रगीत गातो तेव्हा

Subscribe

हिंदी सिनेमांचे अनेक जगभर आहेत. त्यातील अदिल एक आहे. त्याने अनेक हिंदी सिनेमे पाहिले असून करण जोहरचा 'कभी खुशी, कभी गम' हा सिनेमा देखील पाहिला आहे.

सध्या एशिया कप सामने दुबईमध्ये सुरु आहेत. काल भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाला. यात ८ गडी राखत भारताने विजय मिळला. भारतासाठी हा आनंदाचा क्षण नक्कीच होता. पण या आनंदात एक पाकिस्तानी युवक सहभागी झाला आणि सामना जिंकल्यानंतर भारताचे राष्ट्रगीत लावण्यात आले. त्यावेळी पाकिस्तानचा हा क्रिकेट चाहता युवक चक्क भारताचे राष्ट्रगीत गात होता. सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कोण आहे हा युवक?

अदिल राज असे या युवकाचे नाव असून भारत- पाकिस्तानचे संबंध चांगले राहावे यासाठीच त्याने हे राष्ट्रगीत गायले.भारता हा शत्रू देश नसून मित्र देश आहे आणि राहिल, यासाठी त्याने हे राष्ट्रगीत गायल्याचे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्याने राष्ट्रगीत गातानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.अनेकांनी हा युवक कोण? याचा शोध घेऊन त्याला या संदर्भात विचारणा देखील केली.

- Advertisement -


 अदिल हिंदी सिनेमाचा चाहता

हिंदी सिनेमांचे अनेक जगभर आहेत. त्यातील अदिल एक आहे. त्याने अनेक हिंदी सिनेमे पाहिले असून करण जोहरचा ‘कभी खुशी, कभी गम’ हा सिनेमा देखील पाहिला आहे. त्याविषयी तो म्हणाला की, मी हे राष्ट्रगीत या सिनेमात ऐकले त्याक्षणी मला ते खूप आवडले. या राष्ट्रगीतात एक वेगळीच प्रेरणा असल्याचे देखील तो यावेळी म्हणाला.

भारतावर प्रेम

भारत आणि पाकिस्तान देशांमधील तणाव पाहता एकमेकांबद्दल केवळ द्वेषच आहे, असे अनेकांना वाटते. पण अदिलचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक भारतीयांनी त्याला शुभेच्छा देत या व्हिडिओमुळे नक्कीच सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -