घरदेश-विदेशपाकिस्तानी सोशल मीडियावर अफवांना ऊत, म्हणे 'भारतीय विमान पाडलं!'

पाकिस्तानी सोशल मीडियावर अफवांना ऊत, म्हणे ‘भारतीय विमान पाडलं!’

Subscribe

पाकिस्तानचं एफ-१६ हे फायटर विमान भारताने पाडल्यानंतर आता पाकिस्तानकडून भारताचं फायटर विमान पाडल्याचा कांगावा केला जात आहे. पाकिस्तानी मीडिया आणि सोशल मीडियावर अशा प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत.

सीमाभागात बुधवारी सकाळीच पाकिस्तानच्या तीन फायटर विमानांनी घुसखोरी केल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या फायटर विमानांनी या पाकिस्तानी विमानांना परतवून लावलं. यावेळी पाठ दाखवून पळणाऱ्या पाकिस्तानी विमानांपैकी एक विमान एफ-१६ भारतानं प्रतिहल्ल्यामध्ये पाडलं देखील आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सोशल मीडियावर मात्र, पाकिस्तानने एक भारतीय फायटर विमान पाडल्याचा दावा केला जात आहेत. त्यावर भारताला पाकिस्तानशी पंगा न घेण्याचा इशाराही देण्यात येत आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

 

 

अशा प्रकारचे मॉर्फ्ड फोटो सध्या पाकिस्तानी मीडिया आणि पाकिस्तानी सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. मात्र, या प्रकरणात लष्करी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोणत्याही भारतीय फायटर विमानाला धक्का देखील लागलेला नसल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यामुळे पाकिस्तानी सरकारप्रमाणेच पाकिस्तानी माध्यमं देखील खोट्या दाव्यांसह चुकीच्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट होत आहे.


वाचा लाइव्ह अपडेट – भारतानं नौशेरामध्ये पाकिस्तानचं एफ-१६ विमान पाडलं
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -