घरदेश-विदेशतणावाच्या पार्श्वभूमीवर विमानसेवा बंद

तणावाच्या पार्श्वभूमीवर विमानसेवा बंद

Subscribe

पाकिस्तानने हावाई हद्दीचे उल्लंघन केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील विमानतळ बंद करण्यात आली आहेत. भारतातील जम्मू, श्रीनगर, पठाणकोट, अमृतसर, चंदीगड, डेहराडून, धरमशाला आणि लेह या विमानतळावरील विमानसेवा बंद करण्यात आली आहे. त्यानंतर आता पाकिस्तानमधील देखील ५ विमानतळ बंद करण्यात आली आहेत. लाहौर, मुलतान, फैजालाबाद, इस्लामाबाद आणि सियालकोट ही पाच विमानतळ बंद करण्यात आली आहेत. दोन्ही देशांमधील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाईसेवेवर परिणाम झाला आहे.

- Advertisement -

एलओसीवर तणावाचे वातावरण

पुलवामा हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर पाकिस्तानने काल संध्याकाळपासून भारताविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. एलओसीवर पाकिस्तांकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारातच्या दिशेने जोरदार गोळीबार त्याचसोबत ग्रेनेड हल्ले होत आहे. त्यानंतर पाकिस्तानने आज भारताच्या हद्दीमध्ये विमान घुसवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा प्रयत्न भारताने हाणून पाडला. भारताने पाकिस्तानचे विमान पाडले. एलओसीजवळ आणि देशातील प्रमुख राज्यांमध्ये हायअलर्ट देण्यात आला आहे.

- Advertisement -

भारतातील ८ विमानतळ बंद

सध्या दोन्ही देशामध्ये तणावाची परिस्थिती आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव भारतामधील विमानसेवा बंद करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील लेह, जम्मू, श्रीनगर, पठाणकोट, डेहराडून, धरमशाला विमानतळ बंद करण्यात आले. त्यानंतर अमृतसर आणि चंदीगड विमानतळ बंद करण्यात आले आहेत. तसंच मुंबई – चंदीगड, मुंबई – अमृतसर ही विमानसेवा बंद करण्यात आली आहे. तसंच काही विमानाच्या मार्गातही बदल करण्यात आले आहे. देशातील प्रत्येक विमानतळावर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

पाकमध्ये विमानसेवा बंद

पाकमधील देशातंर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली आहे. पकिस्तानने ५ महत्वाचे विमातळ बंद केले आहे. लाहौर, मुलतान, फैजालाबाद, इस्लामाबाद आणि सियालकोट ही पाच विमानतळ बंद करण्यात आली. पाकिस्तानमध्ये सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. भारताकडून पुन्हा हल्ला केला जाईल या भितीने घाबरलेल्या पाकिस्तानने सुरक्षेच्यादृष्टीने पाच विमानतळ बंद केली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -