घरदेश-विदेश"पुढील महिन्यात रशियातून स्वस्त तेल येणार", पाकिस्तानी मंत्र्याचा दावा

“पुढील महिन्यात रशियातून स्वस्त तेल येणार”, पाकिस्तानी मंत्र्याचा दावा

Subscribe

पाकिस्तानचे पेट्रोलियम राज्यमंत्री मुसादिक मलिक यांनी सोमवारी दावा केला की रशियाकडून स्वस्त तेलाची खेप पुढील महिन्यात देशात पोहोचेल.

पाकिस्तानचे पेट्रोलियम राज्यमंत्री मुसादिक मलिक यांनी सोमवारी दावा केला की रशियाकडून स्वस्त तेलाची खेप पुढील महिन्यात देशात पोहोचेल. इस्लामाबादने मॉस्कोशी करार केला आहे. तेलाची पहिली खेप पुढील महिन्यात कार्गोने पाकिस्तानात पोहोचेल, असं देखील पेट्रोलियम राज्यमंत्री म्हणाले.

सरकार जनतेला स्वस्तात तेल देईल, असं आश्वासन मलिक यांनी जनतेला दिलं आहे. गरीब आणि श्रीमंत वर्गासाठी वेगवेगळे दर निश्चित केले जातील. पाकिस्तानला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे आम्ही परवडणाऱ्या किमतीत तेल आयात करण्याचा विचार करत आहोत. सरकारने या दिशेने काम केलं आहे आणि आता गरीब आणि श्रीमंतांसाठी वेगळे बिलिंग होईल, अशी अपेक्षा आहे. दर जाहीर झाल्यानंतर समाजातील गरीब वर्गाला दिलासा मिळणार आहे.

- Advertisement -

पाकिस्तानी पेट्रोलियम विभाग बराच काळ रशियाकडून US$ 50 प्रति बॅरल दराने कच्चे तेल खरेदी करण्याचा प्रयत्न करत होता, जे अमेरिकेपेक्षा US$ 10 प्रति बॅरल कमी आहे. मात्र, रशियातून समुद्रमार्गे तेल येण्यास सुमारे महिनाभराचा कालावधी लागणार आहे. तेल कराराशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, करारावर स्वाक्षरी होण्यापूर्वी पेमेंटची पद्धत, शिपिंगचा खर्च आणि विमा खर्च यासारख्या अटी निश्चित करण्यात आल्या होत्या. रशियासोबतचा तेल करार हाही पाकिस्तानच्या राजकारणातील वादग्रस्त मुद्दा होता. माजी पंतप्रधानांनी दावा केला की, त्यांच्या सरकारने असे परराष्ट्र धोरण बनवले आहे, ज्यामध्ये पाकिस्तानला भारताप्रमाणे रशियाकडून स्वस्त तेल मिळू शकेल.

विद्यमान सरकारने तेल आयातीसाठी मॉस्कोशी करार करण्याचाही प्रयत्न केला. ऑक्टोबर २०२२ मध्ये अर्थमंत्री इशाक दार म्हणाले होते की, देश रशियाकडून सवलतीत तेल खरेदी करण्याची तयारी करत आहे. नंतर मलिक तेल आणि वायू पुरवठ्यासाठी रशियालाही गेले. याशिवाय कराराला अंतिम रूप देण्यासाठी रशियन शिष्टमंडळ जानेवारीमध्ये इस्लामाबादला पोहोचले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -