घरदेश-विदेशराहुल गांधींच्या समर्थनार्थ सूरत कोर्टाबाहेर पोस्टरबाजी; काॅंग्रेसचे जोरदार शक्तीप्रदर्शन

राहुल गांधींच्या समर्थनार्थ सूरत कोर्टाबाहेर पोस्टरबाजी; काॅंग्रेसचे जोरदार शक्तीप्रदर्शन

Subscribe

सुरत न्यायालयाच्या बाहेर काँग्रेसने जोरदार शक्तीप्रदर्शन केले असून न्यायालयाच्या बाहेर राहुल गांधींचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांना बदनामीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने त्यांची खासदारकी रद्द झाली. याच पार्श्वभूमीवर त्यांनी न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात अपिल करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी राहुल गांधी सुरत न्यायालयात दाखल झाले. यावेळी सुरत न्यायालयाच्या बाहेर काँग्रेसने जोरदार शक्तीप्रदर्शन केले असून न्यायालयाच्या बाहेर राहुल गांधींचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया माध्यमांवर व्हायरल होत आहे.

सुरत न्यायालयाच्या बाहेर लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर राहुल गांधींसह काॅंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचाही फोटो आहे. तसेच, या पोस्टर्सवर फोटोसंह डरो मत, सत्यमेव जयते असेही लिहिण्यात आले आहे. युवर काॅंग्रेसच्यावतीने ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

- Advertisement -

सुरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना बदनामीच्या खटल्यात दोषी ठरवले आहेत. मोदी या आडनावावरुन टीका केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काॅंग्रेस आक्रमक

बदानामीच्या खटल्यात शिक्षा झाल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आणि त्यानंतर काॅंग्रेस सत्ताधारी पत्र भाजपविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आता सुरत कोर्टात हजर राहतानादेखील राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सुरत न्यायालयाच्या बाहेर पोस्टरबाजी करत काॅंग्रेसने आपले शक्तीप्रदर्शन केले आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भाजपात जाण्याची शक्यता?, शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा )

राहुल गांधींचे ‘ते’ वक्तव्य कोणते ?

काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात कर्नाटकमध्ये राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरुन पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी सर्वांची आडनावे एक समान कशी ? सर्व चोरांची नावे मोदीच का असतात? असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे गुजरातचे आमदार पुर्णेश मोदी यांनी त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. यानंतर सत्र न्यायालयाने आता राहुल गांधी यांना याप्रकरणात दोषी ठरवले आहे आणि त्यामुळे आता राहुल गांधी यांची खासदारकी गेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -