घरदेश-विदेश325 Mg पेक्षा जास्त Paracetamol ची गोळी घेणं ठरू शकतं घातक! वाचा...

325 Mg पेक्षा जास्त Paracetamol ची गोळी घेणं ठरू शकतं घातक! वाचा कारण

Subscribe

ताप, सर्दी डोकंदुखी आणि अंग दुखीसाठी बऱ्याचदा पॅरासिटामॉल ही गोळी घेताना दिसतात. मात्र 325 mg पेक्षा जास्त कॉम्बिनेटेड पॅरासिटामॉलचे डोस आरोग्यास हानी पोहोचवू शकतो. यासह ते व्यक्तीच्या जीवावर देखील बेतू शकते. पॅरासिटामॉलचा हाय पॉवर डोस घेतल्याने यकृतामध्ये विषबाधा होण्याचा धोका असतो. यामुळेच DCGI (ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) ने 325 mg पेक्षा जास्त कॉम्बिनेटेड पेरासिटामॉलवर बंदी घातली आहे. असे असताना देखील हाय पॉवर असणारा डोस असलेल्या कॉम्बिनेटेड पॅरासिटामॉल गोळ्या मेडिकल स्टोअरमध्ये बेसुमार विकल्या जाताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डीसीजीआयने एका महिन्यापूर्वी फार्मास्युटिकल कंपन्यांना 500 mg पॅरासिटामॉल ऐवजी फक्त 325 mg पॅरासिटामॉल वापरण्याचे आदेश दिले आहेत. परंतु या आदेशानुसार आतापर्यंत कोणताही पुढाकार घेण्यात आलेला नाही. औषधांची विक्री करणारे मेडिकल विक्रेत्यांच्या मते, यासंदर्भात आतापर्यंत कोणताही आदेश आलेला नाही. यामुळेच अशी औषधे अजूनही विकली जात आहेत. एवढेच नाही तर डॉक्टर देखील ही औषधे लिहून देत आहेत.

गेल्या एक महिन्यापूर्वी DCGI ने हा आदेश जारी केला आहे. त्यामध्ये असे म्हटले की, कॉम्बिनेटेड औषधांमध्ये पॅरासिटामॉलचे प्रमाण 325 mg पेक्षा जास्त नसावे. तर अशी औषधे बाजारात विकली जात आहेत ज्यात पॅरासिटामॉलचे प्रमाण 600 mg पर्यंत असल्याचे चिकित्सक डॉ.राजेश कुमार यांनी सांगितले. यासह 24 तासात प्रौढ व्यक्तीला फक्त दोन ग्रॅम पॅरासिटामॉल दिले जाऊ शकते. मात्र अशा परिस्थितीत, फक्त 500 mg किंवा त्यापेक्षा जास्त पॅरासिटामोल टॅब्लेट तीनपेक्षा जास्त वेळा देऊ नये. यापेक्षा जास्त पॅरासिटामॉलचे सेवन केल्यास अनेक आजार होण्याचा धोका असतो. यामध्ये लिव्हर टॉक्सीसिटीपासून सिरोसिस सारख्या गंभीर आजारांचा सहभाग आहे.

- Advertisement -

दरम्यान, 325 मिलिग्रॅमपेक्षा जास्त कॉम्बिनेशन पॅरासिटामॉलच्या औषधांवर बंदी आहे. यासंदर्भात व्यापक मोहीम राबवली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. लोकांना असा सल्ला दिला जात आहे की, कॉम्बिनेशन असणाऱ्या औषधांवर पॅरासिटामॉलचे प्रमाण लक्षात घेऊन औषधे खरेदी करावीत.


अफगाणिस्तानातून भारतात परतलेल्या १४६ पैकी दोघं कोरोना पॉझिटिव्ह

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -