घरताज्या घडामोडीउरणला मुंबईशी जोडण्याच्या दिशेने एक पाऊल; नेरुळ/बेलापूर-उरण प्रकल्पासाठी ओपन वेब गर्डर लॉन्च

उरणला मुंबईशी जोडण्याच्या दिशेने एक पाऊल; नेरुळ/बेलापूर-उरण प्रकल्पासाठी ओपन वेब गर्डर लॉन्च

Subscribe

उरणमधील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर उद्धवू लागली आहे.

उरणमधील औद्योगिक क्षेत्र विस्तारत चालले असून उरणला मुंबई, नवी मुंबई तसेच देशातील विविध राज्यांशी जोडण्याचे काम सुरू आहे. उरणमधील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर उद्धवू लागली आहे. त्यामुळे  कोविड -१९ च्या आव्हानांना न जुमानता, मध्य रेल्वेने नेरुळ/बेलापूर- उरण प्रकल्पासाठी ६१-मीटरचे दोन ओपन वेब गर्डर  नुकतेच लॉन्च केले आहेत. उरणला मुंबई उपनगरीय नेटवर्कशी जोडण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे. हे ६१-मीटर ओपन वेब गर्डर्स मध्य रेल्वे अभियांत्रिकी कार्यशाळा, मनमाड येथे तयार करण्यात आले आणि लाँचिंग साइटवर आणून असेंबल केले गेले. प्रत्येक गर्डरचे वजन २३२ MT आहे (२२० MT गर्डर + १२ MT लिफ्टिंग बीम, होल्डिंग ब्रॅकेट इ.)

पनवेल-जासई-जेएनपीटी लाईनवर क्रॉसिंग लाइन विचारात घेता गर्डर्स लाँच करणे हे एक जटिल काम आहे. ही लाइन कंटेनरची मोठी वाहतूक हाताळते तसेच जेएनपीटी ते पनवेल समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर लाइन निर्माणाधीन आहे. सदर गर्डर २ क्रॉलर रोड क्रेन (पहिली क्रेन = ६०० MT उचलण्याची क्षमता, दुसरी क्रेन = ५०० MT उचलण्याची क्षमता + आपत्कालीन वापरासाठी ७५० MT उचलण्याच्या क्षमतेची १ अतिरिक्त क्रेन) द्वारे लाँच करण्यात आली आहे.

- Advertisement -

गर्डर्स उचलताना, या पुलासाठी तयार केलेल्या तीन इनक्लिनोमीटरद्वारे रोटेशनल हालचालींचे निरीक्षण केले गेले. इनक्लिनोमीटर पहिल्यांदाच वापरण्यात आले. याशिवाय, रेल्वेच्या स्वतःच्या स्ट्रक्चरल टेस्टिंग युनिटला मध्य रेल्वेच्या ब्रिज युनिटने तैनात केले होते, जेणेकरून लॉन्चींग होताना उद्भवणाऱ्या गंभीर प्रसंगावर मात करता येईल. यासाठी सहा स्टेन गेज आणि दोन एक्सेलेरोमीटर वापरण्यात आले आणि कोणत्याही घटकांना जास्त ताण न देता प्रक्षेपण करण्यात आले. ३ जुलै २०२१ रोजी डाउन ट्रॅक वेब गर्डर यशस्वीरित्या लॉन्च करण्यात आले. १२ ऑगस्ट २०२१ रोजी अप ट्रॅक वेब गर्डर लॉन्च करण्यात आले. या प्रक्षेपणासह, या मार्गाच्या द्वितीय टप्प्याची (फेज -२) प्रगती आगाऊ टप्प्यात आहे.

लॉकडाऊन दरम्यान केलेली कामे

मुंबई उपनगरीय कॉरिडॉरच्या रांजणपाडा स्टेशनवरील कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्मचे सुपरस्ट्रक्चर काम, न्हावा-शेवा, द्रोणागिरी आणि उरण स्थानकांवरील पाया (foundation) आणि उप-संरचना कामे, उरण येथे भुयारी मार्गाचे काम, पुलाच्या पायाचे काम, पुलावरील यू-गर्डर हि प्रमुख बांधकामे करण्यात आली. खारकोपर – उरणच्या पट्ट्यामध्ये ५ स्टेशन, २ मोठे पूल, ४६ लहान पूल, ४ रोड अंडर ब्रिज आणि ४ रोड ओव्हर ब्रिज असतील. उपलब्ध कामगारांची सुरक्षा आणि आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे. उरण शहर आणि न्हावा-शेवा बंदर आणि मुंबई महानगर क्षेत्रातील नवीन विकसित क्षेत्र तसेच बृहन्मुंबई दरम्यान थेट प्रवेश प्रदान करून हा प्रकल्प नवी-मुंबईच्या वाढीस गती देण्यास मदत करेल.

- Advertisement -

हेही वाचा – गुळाच्या ढेपेला मुंगळे चिटकलेत, फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -