घरदेश-विदेशपण फाळणीची वेदना सदैव मन जाळते, ही आग कशी विझवणार? राऊतांचा पंतप्रधान...

पण फाळणीची वेदना सदैव मन जाळते, ही आग कशी विझवणार? राऊतांचा पंतप्रधान मोदींना सवाल

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) रविवारी देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी १४ ऑगस्ट हा देशाचा फाळणी वेदना स्मृतीदिन (Partition Horrors Remembrance Day) म्हणून पाळण्याचं जाहीर केलं. यावर आता शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ मधून शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फाळणीची वेदना सदैव मन जाळीत असते ही आग कशी विझवणार? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. फाळणीची वेदना होती आणि आहेच. फक्त त्या वेदनेतून आणखी एका फाळणीची बिजे रोवली जाऊ नयेत हे सध्याच्या राजकर्त्यांनी पाहायला हवं, असं देखील अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.

विभाजन हे राजकारणाचा भाग किंवा खुशीखुशीने झालेले नाही

ज्या इक्बालने पुढे पाकिस्तान निर्मितीला मोठा हातभार लावला त्यानेच, “सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा” असे अजरामर काव्य लिहिले. बॅ. जीना हेसुद्धा स्वातंत्र्यलढ्याचे एक शिलेदार होते व ते जहालपंथी टिळकांचे चाहते होते. न्या. गोखले हे जसे गांधींचे गुरु तसे जीनांचेही गुरु होते. इंग्रजांच्या बेड्यांतून देशाला मुक्त करणे हाच सगळ्यांचा ध्यास होता, पण जसजसे स्वातंत्र्य जवळ येऊ लागले तसतसे हिंदू-मुसलमानांचे झगडे सुरु झाले व त्याचा शेवट द्विराष्ट्र निर्मितीत झाला, पण विभाजन हे काही राजकारणाचा भाग किंवा खुशीखुशीने झालेले नाही. ब्रिटिशांच्या ‘फोडा आणि झोडा’ या नीतीतूनच फाळणी झाली व आपल्या स्वातंत्र्याची ती अपरिहार्यता ठरली.

- Advertisement -

त्या वेदनेची खपली उचकटून काढली

दोन्ही देशांमधली दुभंगलेली मनं दुरुस्त करण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना लाहोरला बस घेऊन गेले. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीसाठी अचानक गेले. ही वेदना संपावी हे मोदींच्याही मनात होतेच. आता त्यांनी त्या वेदनेची खपली उचकटून काढली, अशी टीका करण्यात आली आहे.

वेदनेची ठसठस ७५ वर्षांनंतरही कायम

पाकिस्तानने हिंदू निर्वासित पाठविण्याचे सत्र सुरुच ठेवले. भारतातून रेल्वे गाड्यांतून मुसलमान लाहोर-कराचीत जात होते. त्या रिकाम्या गाड्यांतून कत्तली झालेल्या हिंदूंचे मृतदेह पाठविण्यापर्यंत क्रौर्य टोकाला गेले. लाखांत स्त्रियांवर बलात्कार झाले. घर-संसार, नाती-गोती उद्ध्वस्त झाली. अफगाणिस्तानातील आताच्या तालिबानी हिंसेला मागे टाकणारे प्रकार त्यावेळी फाळणीदरम्यान झाले. भारताच्या पारतंत्र्याचा अंत हा असा रक्तरंजित ठरला व त्या वेदनेची ठसठस ७५ वर्षांनंतरही कायम आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -