घरदेश-विदेशडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचे डोके राहिले अर्धवट, ऑपरेशननंतर डोक्याचे हाड झाले गायब

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचे डोके राहिले अर्धवट, ऑपरेशननंतर डोक्याचे हाड झाले गायब

Subscribe

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh )इंदूर जिल्ह्यातून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची घटना घडली आहे. माहितीनुसार उज्जेनमधील किर्ती परमार यांना काही वर्षापूर्वी ब्रेन ट्यूमरचा आजार झाला होता. 2019 मध्ये परमार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रिया करताना त्यांच्या डोक्यातील एका भागातील हाड काढून टाकण्यात आलं होतं. तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना सांगण्यात आले होते की रिकव्हरी झाल्यानंतर पुन्हा ते हाड लावण्यात येईल. मात्र उपचार पुर्ण झल्यानंतर परमार यांनी पुन्हा हाड जोडण्यासाठी रुग्णालयात संपर्क साधला असता तेव्हा त्यांना हाड नष्ट करण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली. यानंतर परमार यांनी तत्काळ पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत संबधीत डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली आहे. परमार यांच्या म्हणण्यानुसार डॉक्टरांनी त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. तसेच त्यांना डॉक्टरांच्या हलगर्जीरपणामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे अशी तक्रार दाखल केली आहे.(after brain surgery patients the head bone disappeared by the hospital)

तसेच डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कुटुबांतील लोकांनीच त्यांना हाड नष्ट करण्याची परवानगी दिली होती. तर कुटुबीयांनी आम्हाला याबाबत काहीच ठाऊक नसल्याचे म्हंटले आहे. आम्ही अशी कोणतीही परवानगी दिली नाहीये. आम्हाला सांगण्यात आलं होतं की, दुसरी शस्त्रक्रिया करताना डोक्यावरील हाड पुन्हा लावण्यात येईल. यानंतर कुटुबींयानी रुग्णालयातील भोंगळ कारभारावर टीका करत हाडाशिवाय रुग्णाचा चेहरा विचित्र दिसत असल्याने त्यांना पुन्हा हाड लावण्यासाठी 5 लाखाहून अधिक खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्व प्रकरणामुळे रुग्णाच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला असून. त्यांनी रुग्णालया विरोधात तक्रार दाखल केली आहे. सध्या पुढील तपास पोलिस करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

हे हि वाचा- Afghanistan Crisis: काबुल विमानतळाचे ATC ताब्यात घेण्याची अमेरिकेची घोषणा; नागरिकांच्या बचावासाठी ६,००० सैनिकांना केले तैनात

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -