घरदेश-विदेशPetrol Price Today: दिल्लीत पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर; जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे...

Petrol Price Today: दिल्लीत पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर; जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

Subscribe

देशात कोरोना महामारीचं संकट असताना दुसरीकडे पेट्रोल-डिझेल दरवाढीने सामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे. सोमवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार, राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत १०० रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा पेट्रोलच्या किंमती ३५ पैशांनी वाढल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत ९९.८६ रुपयांवर गेली आहे. मात्र, आज डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. दिल्लीत सध्या एक लिटर डिझेलची किंमत ८९.३६ रुपये आहे.

इतर प्रमुख शहरांमध्येही पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत १०५.९३ रुपये आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे तेथे सध्या प्रति लिटर १००.७९ रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमतही वाढल्याने तेथे आज पेट्रोल प्रति लिटर ९९.८० रुपये दराने विकले जात आहे. दरम्यान, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे डिझेलची किंमत साधारण ९६.९१ रुपये, .९३.९१ रुपये आणि ९२.२७ रुपये अशी आहे.

- Advertisement -

भारतातील किरकोळ इंधन दराकडे बारकाईने पाहिल्यास असे दिसून येते की जागतिक स्तरावर तेलाचे दर स्थिर असताना देखील इंधनाचे दर उच्च ठेवणार्‍या करांचा उच्च स्तर आहे. जागतिक पातळीवर, कच्च्या तेलाची किंमत आता प्रति बॅरल ७५ डॉलर इतकी आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये हे प्रति बॅरल ८० डॉलरपेक्षा जास्त होते, परंतु तरीही, देशभरात पेट्रोलचे दर ८० रुपये प्रतिलिटर होते. म्हणून, आता तेलाचे कमी दर असूनही, देशाच्या बर्‍याच भागात पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या पार गेले असून आता त्या किंमती मोठ्या फरकाने वाढल्याचे दिसून येत आहेत.

- Advertisement -

पेट्रोल-डिझेलच्या किंमती दररोज बदल केले जातात. अशा परिस्थितीत तुम्हाला दररोज फक्त एका एसएमएसद्वारे तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत घरबसल्या जाणून घेता येते. यासाठी इंडियन ऑईलच्या ग्राहकांना आरएसपी कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागणार आहे. तुमच्या शहराचा आरएसपी कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.


दिलासा! कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण एका आठवड्यात ३२ टक्क्यांनी घटले, संसर्गही ११ टक्क्यांनी झाले कमी

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -