घरदेश-विदेशझाडे लावा, बक्षीस मिळवा: उत्तर प्रदेश सरकारने ३० कोटी वृक्ष लागवडीसाठी केले...

झाडे लावा, बक्षीस मिळवा: उत्तर प्रदेश सरकारने ३० कोटी वृक्ष लागवडीसाठी केले स्पर्धेचे आयोजन

Subscribe

इच्छिणाऱ्या नागरिकांनी उत्तर प्रदेश वन विभागाच्या वेबसाईटवर वृक्ष लागवड केल्याचे फोटो अपलोड करायचे आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी एकाच दिवशी राज्यभरात तब्बल २५ कोटी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वृक्षारोपणाची ही मोहिम यशस्वीरित्या पार पडावी यासाठी राज्य प्रशासनाने जिल्हा अधिकाऱ्यांना काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी झाशी येथे रोपांची लागवड केली तर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी रविवारी सुलतानपूर येथील पूर्वांचल एक्स्प्रेस वेजवळ वृक्ष लागवड केली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १ जुलै ते ७ जुलैदरम्यान राज्यभरात ३० कोटी वृक्ष लावण्याचे लक्ष निश्चित केले आहे. हे लक्ष पू्र्ण करण्यासाठी अनेक जिल्ह्यात वृक्ष लागवडीला सुरुवात करण्यात आली. यासाठी उत्तरप्रदेश राज्य प्रशासनाने संबंधित भागातील हवामानास अनुकूल रोपेही पुरवठा केला. आतापर्यंत अशा १७ कोटीहून अधिक रोपट्यांचे वाटप करण्यात आले आहे.

- Advertisement -

‘झाडे लावा, बक्षिस मिळवा’

या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने ‘झाडे लावा, बक्षिस मिळवा’ या नावाने एका स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी उत्तर प्रदेश वन विभागाच्या वेबसाईटवर वृक्ष लागवड केल्याचे फोटो अपलोड करायचे आहेत. यासाठी राज्य सरकाराने एक विशेष बक्षिसाची घोषणा केली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या वृक्षरोपणाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वात आत्तापर्यंत राज्य़भरात ६०,२४,४६,५५१ वृक्ष लागवड करण्यात आल्याचे उत्तर प्रदेश राज्य सरकारने सांगितले आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -