घरदेश-विदेशPm Modi: 'येत्या 100 दिवसांत प्रत्येक नव्या मतदाराला संपर्क करा; पंतप्रधान मोदींचं...

Pm Modi: ‘येत्या 100 दिवसांत प्रत्येक नव्या मतदाराला संपर्क करा; पंतप्रधान मोदींचं कार्यकर्त्यांना आवाहन

Subscribe

दिल्लीत सुरू असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. संमेलनात पीएम मोदी म्हणाले की, 'पुढील 100 दिवसांमध्ये आपल्याला एकत्र काम करायचे आहे.

नवी दिल्ली: दिल्लीत सुरू असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. संमेलनात पीएम मोदी म्हणाले की, ‘पुढील 100 दिवसांमध्ये आपल्याला एकत्र काम करायचे आहे. सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. प्रत्येक वर्गापर्यंत, प्रत्येक परंपरेच्या लोकांपर्यंत पोहचा. आता 18 वर्षांच्या झालेल्या प्रत्येक नव्या मतदारापर्यंत आपण पोहोचायला हवं, असंही मोदी यावेळी म्हणाले. (PM Modi Contact every new voter in the next 100 days Prime Minister Narendra Modi s appeal to workers)

सत्तेत असूनही भाजपचे कार्यकर्ते खूप काम करतात

पंतप्रधान म्हणाले, ‘काल अधिकाऱ्यांसोबत बसण्याची संधी मिळाली. मी भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा, त्यांच्या संपूर्ण टीमचे आणि तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. एका वर्षाच्या कामाचा अहवाल ऐकत असताना, मला एवढा भावला की, सत्तेत असूनही भाजपचे कार्यकर्ते समाजासाठी एवढी कामे करतात.

- Advertisement -

पुढचे 100 दिवस एकत्र काम करायचंय

पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, ‘पुढच्या 100 दिवसांत आपल्याला एकत्र काम करायचे आहे. सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. प्रत्येक वर्गापर्यंत, प्रत्येक परंपरापर्यंत पोहोचावे लागणार आहे. आपण सर्वांचा विश्वास संपादन केला पाहिजे. भाजपला जास्तीत जास्त जागा मिळून देशसेवा करण्याची संधी देण्याचा सर्वांचा प्रयत्न असेल, असंही मोदी म्हणाले.

जैन ऋषी श्री विद्यासागर महाराजांचे स्मरण

पीएम मोदी म्हणाले, ‘नड्डाजींच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. आज तमाम देशवासियांच्यावतीने मी संत शिरोमणी आचार्य श्री पूज्य विद्यासागर महाराज यांना श्रद्धेने व आदराने वंदन करतो. त्यांनी समाधी घेतल्याचे वृत्त समजताच त्यांच्या अनुयायांवर शोककळा पसरली आहे. आम्ही सर्व शोकग्रस्त आहोत. माझ्यासाठी हे वैयक्तिक नुकसानासारखे वाटते. गेल्या अनेक वर्षांत मला त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची आणि त्यांचे मार्गदर्शन घेण्याची संधी मिळाली. 50 वर्षांहून अधिक काळ मला देशातील नामवंत आध्यात्मिक व्यक्तींचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: TMC: घरोघरी जाऊन सुंदर महिलांची यादी, अन् रात्री कार्यालयात…; ‘या’ पक्षातील नेत्यावर महिलांचा गंभीर आरोप)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -