घरदेश-विदेशTMC: घरोघरी जाऊन सुंदर महिलांची यादी, अन् रात्री कार्यालयात...; 'या' पक्षातील नेत्यावर...

TMC: घरोघरी जाऊन सुंदर महिलांची यादी, अन् रात्री कार्यालयात…; ‘या’ पक्षातील नेत्यावर महिलांचा गंभीर आरोप

Subscribe

पश्चिम बंगालमधील संदेशखळी येथून तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कोलकाता: नेत्याचे कार्यकर्ते घरोघरी येतात. प्रत्येक घरातील सुंदर मुलगी किंवा लग्न झालेली सुंदर महिला हेरतात. त्यांची एक यादी करुन, त्या महिलांना रात्री पक्ष कार्यालयात बोलावतात. त्या महिला आल्या नाहीत, तर त्यांचं अपहरण करून घेऊन जातात. तिथे त्या महिलांवर वारंवार बलात्कार करतात आणि त्या नेत्याचं मन भरेपर्यंत त्या महिलांना पक्ष कार्यालयातच ठेवलं जात, असा गंभीर आरोप महिलांनी केला आहे. ही धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधून समोर आली आहे. ज्या पक्षाच्या प्रमुख एक महिला (ममता बॅनर्जी) आहेत, त्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यावर हा गंभीर आरोप केला जात आहे. सध्या हा नेता फरार आहे. (TMC List of beautiful women going door to door and at night at the office Serious accusation of women against the leader of TMC sheikh shahjahan Mamata Banerjee party)

पश्चिम बंगालमधील संदेशखळी येथून तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसचे लोक घरात घुसतात, असा आरोप महिलांनी केला आहे. जर एखादी स्त्री सुंदर दिसली तर ते तिला सोबत घेऊन जातात. तिच्यावर अनेक दिवस बलात्कार होतो. त्यांचं मन भरेपर्यंत ते त्या महिलांना आपल्या ताब्यात ठेवतात आणि नंतर सोडून देतात.

- Advertisement -

टीएमसी लोकांकडून होत असलेल्या या अत्याचाराविरोधात महिलांनी रस्त्यावर उतरून आवाज उठवला आहे. महिलांनी आरोप केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. व्हिडिओमध्ये महिला म्हणते, “पक्षाचे (तृणमूल) लोक येतात. ते घरोघरी जातात आणि पाहतात की कोणाची पत्नी आणि कोणाची मुलगी तरुण आहे. कोण सुंदर आहे. यानंतर ते महिलेला पक्ष कार्यालयात घेऊन जातात आणि अनेकवेळा तिच्यावर बलात्कार करतात.

याप्रकरणी महिलांनी स्थानिक टीएमसी नेते आणि जिल्हा परिषद सदस्य शेख शाहजहान यांचे नाव मुख्य आरोपी म्हणून ठेवले असून, त्याच्या अटकेची मागणी केली आहे. शेख शाहजहान हा तोच नेता ज्याने ईडी धाड टाकायला आली असताना, ईडीच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला होता. त्याच्यावर जमीन हडप केल्याचा आरोपही महिलांनी केला आहे. ईडीवर हल्ला केल्याच्या प्रकरणात शेख शाहजहान फरार आहे.

- Advertisement -

संदेशखळी हे सुंदरबनमधील एक बेट 

संदेशखळी हे पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात आहे. हे सुंदरबनमधील एक बेट आहे. इथून बांगलादेशची सीमा जवळ आहे. या बेटावर फक्त बोटीने जाता येते. भाजपचे पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ट्विटरवर पोस्ट केले: “शेख शाहजहान आणि त्याच्या टोळीने संदेशखळीमध्ये ‘दहशतवादाचे राज्य’ स्थापन केले आहे. एससी आणि एसटी समाजातील महिलांच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन केले जात आहे.

संदेशखळी येथील महिलांचं आंदोलन 

संदेशखळीच्या महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप लावले आणि टीएमसी नेते शाहजहान शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात निदर्शने केली. एका व्हिडिओमध्ये विरोध करणाऱ्या एका महिलेने म्हटले आहे की, टीएमसीचे लोक रात्रीच्या वेळी त्यांच्या आवडीच्या कोणत्याही महिलेला कार्यालयात घेऊन जातात. तिच्या पतीला सांगितले जाते की त्याचा महिलेवर कोणताही अधिकार नाही.

एका महिलेने आपल्यासोबत घडलेल्या घटनेबाबत सांगितले की, ते आमच्याशी गैरवर्तन करतात. येथील महिला सुरक्षित राहू शकत नाहीत. महिला बाहेर पडायला घाबरतात. पोलीस गुन्हेगारांना पाठीशी घालतात. 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता पोलिसांसह 20-30 लोक त्यांच्या घरी आले. खिडकी आणि दरवाजा तोडला होता. “त्यांनी माझे केस ओढले आणि माझ्या हातून माझी मुलगी हिसकावून तिला फेकून दिले,” असं पीडित महिलेनं म्हटलं आहे.

(हेही वाचा: Riteish Deshmukh : काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत भाऊ अमित देशमुखांबद्दल रितेश यांनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले…)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -