घरदेश-विदेशयापुढे सहन करणार नाही; मोदींचा इशारा कुणाला?

यापुढे सहन करणार नाही; मोदींचा इशारा कुणाला?

Subscribe

'वैभवशाली भारताच्या निर्माणामध्ये आपलं अमूल्य योदगान असून, महिलांचा त्यामध्ये महत्वाचं स्थान आहे', अशी भावना मोदींनी सीआयएसएफ विषयी यावेळी व्यक्त केली.

‘सीआयएसएफ’च्या ५० व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानवर निशाणा साधला. पुलवामा हल्ला आणि भारताने केलेल्या एअर स्ट्राईकवर बोलतेवेळी ‘आता दहशतवाद प्रकरणी गप्प बसणार नाही. खूप झाले यापुढे आम्ही सहन करणार नाही’ अशा शब्दांत मोदींनी पाकिस्तानचे नाव न घेता त्यांना थेट इशारा दिला. पुलवामा आणि उरी हल्ल्याला भारतीय सरकारने कडक कारवाई केली आहे, हे सांगायला मोदी विसरले नाहीत. सीआयएसएफला देश आणि औद्योगिक प्रतिष्ठानची सुरक्षेचा आधार सांगत पंतप्रधान मोदींनी सीआयएसएफचे कौतुक केले. ‘वैभवशाली भारताच्या निर्मणामध्ये आपलं अमूल्य योदगान असून, महिलांचा त्यामध्ये महत्वाचं स्थान आहे’, अशी भावना मोदींनी यावेळी व्यक्त केली.

महिला शक्तीला सलाम

सीआयएसएफ (केंद्रीय सुरक्षा राखीव दल) देश आणि औद्योगिक प्रतिष्ठानचा आधार असल्याचं म्हणत मोदींनी सीआयएसएफचे कौतुक केले. गाझीयाबादमधील सीआयएसफ कॅम्पमधील जवानांना संबोधित करताना मोदी म्हणाले, ‘तुमच्या हातात देशाची सुरक्षा आहे. औद्योगिक प्रतिष्ठानची सुरक्षा आहे. कोणत्याही व्हीआयपीला सुरक्षा देण्यापेक्षाही तुमचे काम मोठे आहे’. सीआयएसएफ मधील महिलांच्या योगदानाविषयी बोलताना मोदी म्हणाले की, ‘सीआयएसएफमध्ये गणवेश परिधान केलेल्या मुलीची संख्या खूप मोठी आहे. या मुलीसोबत मी त्यांच्या आईचंही अभिनंदन करतो.

- Advertisement -

पाकिस्तानला अप्रत्यक्ष टोला

‘ज्यावेळी विदेशी देशावर संकट ओढावले त्या-त्यावेळी संकट  सीआयएसएफच्या जवानांनी जीव धोक्यात घातला आणि देशाचं रक्षण केलं. त्यांना मदत केली. नेपाळ आणि हैतीमध्ये झालेल्या भूकंपाच्यावेळी त्यांनी केलेल्या मदतीची दखल आंतरराष्ट्रीय मीडियानेसुद्धा घेतली होती. जर ‘एखादं शेजारी राष्ट्र लढण्यास असमर्थ असेल तर, ते दुसऱ्या देशातील सुरक्षेला नुकसान पोहचवण्याचं काम करते. याच प्रकाराचं दुसरं नाव आहे दहशतवाद…’ असं वक्तव्य करत मोदींनी पाकला अप्रत्यक्ष टोला हाणला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -