घरदेश-विदेशपाकला एअर स्ट्राइक भीती; FATF मध्ये केली याचिका दाखल

पाकला एअर स्ट्राइक भीती; FATF मध्ये केली याचिका दाखल

Subscribe

पुलवामा हल्ल्याला प्रत्यत्तर देताना भारतीय हवाईदलाने २६ फेब्रुवारीला केलेल्या एअर स्ट्राइक सारखी कारवाई भारत पुन्हा करले या भीतीने पाकिस्तानने FATF मध्ये याचिका दाखल केली आहे.

भारताने एअर स्ट्राइक केल्यानंतर जागतिक स्तरावरदेखील पाकिस्तानची कोंडी केली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानने फ्रान्समधील फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सला (FATF) पत्र लिहून भारताला एशिया पॅसिपिक जॉईंट ग्रुपच्या सह अध्यक्षपदावरून काढून टाकण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पाकिस्तान कुठेतरी भारताला घाबरला असल्याचं चित्र दिसत आहे. भारताने एअर स्ट्राइक करत हवाई हद्दीच उल्लंघन केल्याच कारण देत फ्रान्सकडे ही मागणी केली आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री असद उमर यांनी FATF चे अध्यक्ष मार्शल बिलिंगसलीआ यांना हे पत्र लिहिले आहे. या पदावर भारताऐवजी इतर कोणत्याही अशियाई देशाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

काय आहे ‘ एफएटीएफ ‘?

एकूण ३७ राष्ट्रांचा समावेश असेलेली एफएटीएफ ही फ्रान्सच्या पॅरिसमध्ये स्थित आंतर-सरकारी संस्था आहे. बेकायदेशीर संघटनांना अर्थिक मदत रोखण्यासाठीची नियमावली तयार करणे हे या संस्थेचे प्रमुख काम आहे. १९९७ मध्ये ७ देशांनी पुढाकार घेत या संस्थेची स्थापना केली. ‘फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या’ काळ्या यादीत म्हणजेच ‘ग्रे’ लिस्टमध्ये पाकिस्तानचा समावेश आहे. दहशतवादाला खतपाणी घालत असल्याने आणि त्याविरोधात ठोस कारवाई करत नसल्याने पाकिस्तानला ‘ग्रे’ लिस्टमध्ये टाकण्यात आले आहे. २००१ साली दहशतवादाच्या प्रचार-प्रसारासाठी आर्थिक आणि शस्त्र सामग्रीचा पुरवठा केला जातो, त्याच्यावरही नियंत्रण असावे म्हणून या विषयाचा ‘एफएटीएफ’च्या कार्यक्षेत्रात समावेश करण्यात आला.

- Advertisement -

पाकिस्तानने काय मागणी केली ?

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने सुरक्षा परिषदेकडे जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला जागतिक स्तरावर दहशतावादी घोषित करण्याच्या मागणीला अमेरीका, फ्रान्सने पाठिंबा दिला. त्यामुळे पाकची जागतिक स्तरावर कोंडी झाली होती. तसेच दहशतवादाला खतपाणी घालू नका, असे अमेरिकेने पाकिस्तानला सुनावले. त्यामुळे पाकिस्तान भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करु पाहात आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री असद उमर यांनी ‘एफएटीएफ’ अध्यक्ष मार्शल बिलिंगसलीआ यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात भारताला एफएटीएफच्या सह अध्यक्षपदावरुन काढण्याची मागणी त्यांनी केली आहे. ही कारवाई केल्यास एफटीआयची कारवाई निष्पक्षपाती आणि पारदर्शी होईल, असे देखील त्यांनी नमुद केले आहे. भारताने हवाई हद्दीचे उल्लंघन करत पाकिस्तानात घुसखोरी केली. तसेच पाकिस्तानशी उघडपणे शत्रुत्व उत्पन्न केल्याचे पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यानी पत्रात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -