घरदेश-विदेश"पंतप्रधान मोदींची हत्या झाल्यास भारताचे विघटन",हाफिज सईदचे भडकाऊ भाषण

“पंतप्रधान मोदींची हत्या झाल्यास भारताचे विघटन”,हाफिज सईदचे भडकाऊ भाषण

Subscribe

"भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करणार असून, त्यामुळे भारतात अराजकता माजेल"अशा शब्दात जमात-उल-दावाचा नेता हाफिज सईद याने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. हाफिज सईद सोबत जमात-उल-दावाचा नेता बशीर अहमद खाकी याने देखील भारताविरोधात विखारी विधानांची भर घातली. "भारत आणि अमेरिकेत इस्लामचे वर्चस्व येईल. शिवाय भारत आणि इस्त्राईलचे विघटन होऊन, दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात अराजकता माजेल." असे बशीर अहमद खाकी म्हणाला आहे.

“भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करणार असून, त्यामुळे भारतात अराजकता माजेल” अशा शब्दात जमात-उल-दावाचा नेता हाफिज सईद याने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. सईदच्या या वक्तव्याने खळबळ उडाली असून हाफिज सईदने उघडपणे गरळ ओकल्याने भारतीय सुरक्षा यंत्रणा देखील आता सतर्क झाल्या आहेत. हाफीज सईद हा मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातली बातमी दिली आहे. मे महिन्यात गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकाने ‘आयसीस’ या दहशतवादी संघटनेने रचलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट उधळून लावला होता.

हाफिज सईद सोबत जमात-उल-दावाचा नेता बशीर अहमद खाकी याने देखील भारताविरोधात विखारी विधानांची भर घातली. “भारत आणि अमेरिकेत इस्लामचे वर्चस्व येईल. शिवाय भारत आणि इस्त्राईलचे विघटन होऊन, दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात अराजकता माजेल.” पाक व्याप्त काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यातील रावलकोट भागात रमझान निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत असताना जमात-उल- दावाच्या दोन्ही दहशतवादी नेत्यांनी पुन्हा एकदा भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय रमझान सारख्या पवित्र महिन्यात ‘जिहाद’ची हाक देखील बशीर अहमद खाकी याने दिली आहे.

- Advertisement -

“जिहाद पुकारा”

“रमाझान पवित्र महिना आहे. या महिन्यात तुम्ही जिहादची हाक द्या. रमझानसारख्या पवित्र महिन्यात शहीद झाल्यास तु्म्हाला स्वर्गाची दारे उघडी होतील”, अशा शब्दात बशीर अहमद खाकी याने उपस्थित समुदायाची माथी भडकवली. शिवाय, “जमात-उल-दावाने काश्मीरमध्ये जिहादची हाक दिली आहे. “भारतापासून काश्मीरला वाचवण्यासाठी तुम्ही देखील ‘जिहाद’ची हाक देत जमात-उल-दावामध्ये सहभागी व्हा”, असे आवाहन बशीर अहमद खाकी याने उपस्थितांना केले. “पाकव्याप्त काश्मीरमधल्या मातांनी त्यांच्या मुलांना जिहादमध्ये सहभागी होण्यासाठी परवानगी द्यावी”, असे देखील बशीर अहमद खाकी याने म्हटले आहे. “जमात-उल- दावाने उभारलेल्या ‘जिहाद’ला वस्तु आणि पैशाच्या स्वरूपात मदत करा”, असे आवाहन देखील बशीर अहमद खाकी याने उपस्थितांना केले.

वर्षभरापूर्वी जमात – उल – दावा या दहशतवादी संघटनेवर बंदी घालण्यात आलेली आहे. तर, जमात-उल- दावाचा दहशतवादी नेता हाफिज सईद जानेवारी – २०१७ ते नोव्हेंबर – २०१७मध्ये पाकिस्तानमध्ये नजरकैदेत होता. सशर्त अटींवर सध्या त्याला सोडण्यात आले आहे. या सर्व दहशतवादी घडामोडींनंतर अमेरिकेने देखील पाकिस्तानला होणारी २ मिलियन डॉलरची मदत थांबवली आहे. शिवाय “पाकिस्तानातील दहशतवादी स्थळ नष्ट करा” असा दम देखील ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानला भरला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -