घरदेश-विदेशविकास, विश्वास आणि बदल; पंतप्रधान मोदींचा १०० दिवसांबाबत आशावाद

विकास, विश्वास आणि बदल; पंतप्रधान मोदींचा १०० दिवसांबाबत आशावाद

Subscribe

एनडीए सरकारचे पहिले १०० दिवस हे देशाचा विकास, विश्वास आणि मोठ्या बदलाचे असून येत्या आगामी काळात त्याचे फायदे दिसून येणार आहेत.

नव्या एनडीए सरकारचे पहिले १०० दिवस हे देशाचा विकास, विश्वास आणि मोठ्या बदलाचे आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले. मागील १०० दिवसांत जे काही मोठे निर्णय घेण्यात आले, त्यामागील प्रेरणा ही देशातील १३० कोटी जनता आहे, असे नरेंद्र मोदी यांनी हरयाणाच्या रोहतकमध्ये आयोजित विशाल रॅलीत सांगितले आहे.

मोदी सरकारच्या निर्णयांचे फायदे दिसणार

केंद्र सरकारने पहिल्या १०० दिवसांत जे मोठे निर्णय घेतले आहेत, त्यांचा फायदा आगामी काळात दिसून येईल. मग तो निर्णय जम्मू-काश्मीर आणि लड्डाखचा असेल नाहीतर पाणी समस्येचा असेल, असे देखील ते पुढे म्हणाले. तसेच भारतातील १३० कोटी नागरीक समस्यांचा नवीन तोडगा शोधू लागले आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्याचप्रमाणे संसदेच्या मागील सत्रात जी विधेयक संमत झाली. जे काम झाले. ते भारतीय संसदीय इतिहासात मागील ६० वर्षांत झाले नव्हते. या ऐतिहासिक कामकाजाबद्दल मी सर्व राजकीय पक्षांचे आभार मानतो, असेही मोदी यांनी सांगितले. देशातील शेतकर्‍यांसाठी जी निवृत्ती योजना लागू करणार्‍यात आली आहे तशीच योजना लघु आणि मध्यम व्यावसायिकांसाठी लागू करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – कलम ३७१ मध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत – अमित शाह


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -