घरदेश-विदेशपंतप्रधानांनी दिल्या गुढीपाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा!

पंतप्रधानांनी दिल्या गुढीपाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा!

Subscribe

मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मराठीतून पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या गुढी पाडव्याच्या शुभदिनी मुंबईसोबत राज्यातील काही मुख्य शहरांमध्ये पारंपारिक पद्धतीने शोभायात्रेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाचा राज्यभरात मोठा उत्साह पहायला मिळत आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये नववर्षानिमित्त शोभायात्रा उत्साहात पार पडत आहेत. यामध्ये पारंपारिक मराठी पोशाखात तरुणाई सहभागी झालेली दिसत आहे. रस्त्यांवर सामाजिक संदेश देणाऱ्या भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. पारंपारिक ढोल-ताशांच्या साथीने मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

राज्यभरात साजरा होणाऱ्या या पाडव्याचा जल्लोषासह सोशल मीडियावर देखील हा उत्साह, आनंद शुभेच्छांच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. पाडव्याच्या शुभेच्छा देणारे संदेश मोठ्या प्रमाणात कलाकार मंडळींसोबत राजकीय क्षेत्रातून देखील बघायला मिळत आहे. अनेक जनतेस पाडव्याच्या शुभेच्छा देणारे संदेश सोशल मीडियावर फॉरवर्ड होत आहेत. यापैकीच एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर मराठी भाषेतून पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींनी मराठी जनतेला गुढी पाडव्याच्या आणि मराठी-हिंदू नव वर्षाच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये त्यांनी असे म्हटले की, ‘महाराष्ट्र आणि जगभरातील मराठी बांधवांना हे नवे वर्ष आनंदाचे, उत्तम आरोग्याचे, भरभराटीचे आणि समृद्धीचे जावो,’ अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -