घरमहाराष्ट्रपार्थ नवखा आहे; चुक झाली म्हणून फासावर लटकवता का?- अजित पवार

पार्थ नवखा आहे; चुक झाली म्हणून फासावर लटकवता का?- अजित पवार

Subscribe

मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत असलेला पार्थ पवार नेटकऱ्यांच्या रडारवर येत आहे.

निवडणूक प्रचारा दरम्यान, अजित पवार यांचा सुपूत्र पार्थ पवार एका चर्चमध्ये ख्रिस्ती धर्मगुरुंना भेटायला गेल्यामुळे सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांतून पार्थ पवारचा फादर सोबतचा फोटो व्हायरल होत आहे. त्यावर अनेक टिका होत असून अजित पवार यांनी पार्थ नवखा आहे, तरुण आहे, चुकला म्हणून फासावर द्याल का? असे म्हणत प्रसार माध्यमां समोर आगपाखड केली आहे. मावळ मतदार संघातून पार्थ पवार राष्ट्रवादीतर्फे लोकसभेच्या रिंगणात आहे. पवार घराण्याची पुढची पीढी राजकारणात आल्याने मावळ मतदार संघ राज्यात चर्चेचा विषय आहे.

काय म्हणाले अजित पवार?

यावर प्रसार माध्यमांमध्ये प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, प्रचारा दरम्यान, सहकारी मंडळी आग्रह धरतात आणि मग जावं लागतं. पार्थचे ख्रिस्ती धर्मगुरुंकडे जाणे चुकीचेच आहे. मात्र तो तरुण आहे, पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. अजाणतेपणी त्याच्याकडून चुक घडली. आता या चुकीसाठी त्याला फासवार द्याल का? असे अजित पवार म्हणाले गेल्या आठवड्यात पार्थ पवारने विनियार्ड वर्कर्स र्चचला भेट दिली. यावेळी चर्चचे फादर डॉ. पीटर सिलव्हा यांनी त्याला विजयासाठी आशिर्वाद दिले. याआधी या चर्चेचे फादर अंधश्रद्धेमुळे आधिच चर्चेत आहेत. केवळ ईश्वराच्या स्पर्शाने आणि प्रार्थनेने आजार बरा होतो, असे या फादरचे म्हणणे आहे. त्यात पार्थ पवारने त्यांचा आशिर्वाद घेतल्याने तो सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

- Advertisement -

आधी प्पपू म्हणून ट्रोल

राहुल गांधी यांना देशाच्या राजकारणात पप्पू असे नाव देऊन सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले. तर महाराष्ट्रात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना पप्पू असे नाव देऊन ट्रोल करण्यात येत आहे. प्रचार सभा असो किंवा प्रचाराची रॅली असो नेहमी उशिरा पोहोचणे, प्रसार माध्यमांना समर्पक उत्तर न देणे, उद्धट भाषा वापरणे यामुळे पार्थ पवार या आधीपासूनच सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. पार्थने आपल्या निवडणूक प्रचाराची सुरवात गणपची बाप्पांच्या दर्शनाने केली होती. यानंतर देहुमध्ये जाऊन त्याने संत तुकारामांचे दर्शन घेतले होते. रॅलिमध्ये नाचणे, ट्रेनमधून प्रवास, ट्राफिक नसताना रस्त्याने धावत सभेच्या ठिकाणी जाणे, अशा अनेक कारणांनी पार्थ सोशल मीडियावर र्चेचेचा विषय बनला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -