घरदेश-विदेशसैनिकांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही; जशास तसं उत्तर देण्यास आम्ही सक्षम -...

सैनिकांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही; जशास तसं उत्तर देण्यास आम्ही सक्षम – पंतप्रधान

Subscribe

भारताला शांतता हवी आहे याबद्दल कोणालाही शंका असण्याचं कारण नाही. पण डिवचलं तर वेळ आल्यावर भारत जशास तसं उत्तर देण्यास सक्षम आहे.

भारत-चीन सीमेवर झालेल्या हिंसक चकमकीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाईव्ह येत संबोधित केलं. देशातील नागरिकांना मी आश्वासन देतो की भारतीय जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. भारत जशास तसे उत्तर देण्यास सक्षम आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारतानं आपल्या शेजारी देशांशी सहकार्याची भावना ठेवली. भारताने कधीही स्वत:हून कोणतंही पाऊल उचललेलं नाही. भारत हा शांतताप्रिय देश आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“आम्ही नेहमीच शेजारील देशांशी सहकार्याची भावना ठेवली आहे. जर मतभेद असतील तर ते सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय जवानांनी आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलं आहे. आपली क्षमता सिद्ध केली आहे. विक्रम आणि शौर्य आपल्या देशाच्या चारित्र्याचा भाग आहे. भारतीय जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही असा विश्वास मला देशवासियांना द्यायचा आहे. आपल्यासाठी भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व सर्वोच्च आहे. यासाठी त्याची रक्षा करण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही. भारताला शांतता हवी आहे याबद्दल कोणालाही शंका असण्याचं कारण नाही. पण डिवचलं तर वेळ आल्यावर भारत जशास तसं उत्तर देण्यास सक्षम आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाण्यातील कोविड रुग्णालाचे इ-लोकार्पण


लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता या मुद्यावर सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे. १९ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली असून लडाखमधील भारत-चीन सीमाभागातील परिस्थितीविषयी चर्चा केली जाणार आहे. व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे ही बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे या बैठकीत सहभागी होणार आहे. याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -