घरCORONA UPDATEमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाण्यातील कोविड रुग्णालाचे इ-लोकार्पण

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाण्यातील कोविड रुग्णालाचे इ-लोकार्पण

Subscribe

आता आपण विषाणूच्या मागे लागायचं - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून मुंबई हे हॉटस्पॉट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाटी राज्य सरकार आणि पालिका झटत आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज कोविड-१९ महामारीचा प्रभावीपणे सामना करता यावा आणि कोविड बाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करता यावे यासाठी उभारलेल्या ठाणे येथील कोविड रुग्णालयाचे ऑनलाईन लोकार्पण करण्यात आलं. या रुग्णालयातही ICU, व्हेंटिलेटर्ससह ऑक्सिजन यांसारख्या सुविधा उपलब्ध असणार आहेत. या रूग्णालयामध्ये एकूण १०२४ बेड्स असून ५०० बेड्स हे सेंट्रल ऑक्सिजनची सुविधा असलेले आहेत. यातील ७६ बेड्स हे आयसीयूचे असून १० बेड्स डायलिसिस रूग्णांसाठी तर १० बेडस ट्रॉमासाठी ठेवण्यात आलेले आहेत. आवश्यकता वाटल्यास या रूग्णालयामध्ये अतिरिक्त ३०० बेड्स निर्माण करता येऊ शकतात. ठाण्यात तब्बल २४ दिवसात कोविड रुग्णालय उभारण्याचा विक्रम केला आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील कोविड रुग्णालयातील फेज २ आणि ठाण्यातील कोविड रुग्णालाचे इ-लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी ‘चेस द व्हायरस’ मोहीम आपण हाती घेतली आहे. आता विषाणू आपल्या मागे लागता कामा नये, तर आपण विषाणूच्या मागे लागायचं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणाले. राज्यामध्ये जेव्हा कोरोनाचा पहिला रूग्ण सापडला तेव्हाची आरोग्य व्यवस्था आणि आताची आरोग्य व्यवस्था यात खूप मोठा फरक आहे. हा बदल करण्यात सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. प्रत्येक आरोग्य सुविधा उभारण्यात आणि औषधांच्या वापरात आपण जगाच्या पाठी नाही तर जगाच्या पुढे आहोत. कोविड योद्ध्यांना लढण्यासाठी शस्त्र आणि आयुधं पुरवण्याचं काम आपण करत आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग तसंच कंटेन्मेंट झोनमधली योग्य उपाय योजनांमुळे धारावी आणि मालेगावमधील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात सरकारला यश आलं आहे. याच पद्धतीने इतर हॉटस्पॉटमध्ये काम करून कोरोना आटोक्यात आणायचा आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील कोविड रुग्णालयातील फेज २ चं इ-लोकार्पण करण्यात आलं. मुंबईतील बीकेसी फेज २ कोविड रुग्णालयामुळे रुग्णांसाठी अधिकच्या एक हजार खाटा उपलब्ध होतील. यात १०८ ICU खाटा तर २० डायलिसिस आणि ५०० ऑक्सिजन खाटांचा समावेश आहे.

- Advertisement -


हेही वाचा – चीनच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी १९ जूनला बोलावली सर्व पक्षीय बैठक


 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -