घरदेश-विदेशपंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशाच्या दौऱ्यावर रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशाच्या दौऱ्यावर रवाना

Subscribe

दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रांसचा दौरा करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रांस, संयुक्त अरब अमिरातच्या आणि बहारिन या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रांसचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रांसचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान एडवर्ड फिलिप यांची भेट घेणार आहे.

या भेटीदरमान्य भारत-फ्रांस द्विपक्षीय संबंध तसेच प्रादेशिक, सामरिक तसेच विविध विषयावर सखोल मंथन होणार आहे. भारत- फ्रांस यांच्यात प्रतिनिधीमंडळ स्तराची वार्ता आयोजित करण्यात आली आहे. भारत- फ्रांस संयुक्त निवेदन सुद्धा सादर करणार आहे. फ्रांसचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ भोजनाचे आयोजन देखील केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा- आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांनंतर आता खासदार सुप्रिया सुळेंचाही स्वतंत्र दौरा

मोदींनी या दौऱ्यात सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘जायद’ प्रदान केला जाणार

ऑगस्ट २३ आणि २४ दरम्यान पंतप्रधान मोदी संयुक्त अरब अमिरातचे युवराज शेख मोहम्मद बिन झाएद अल नाह्यान यांच्या सह अनेक नेत्यांना भेटणार आहे. या प्रसंगी भारत आणि संयुक्त अरब अमिरात मधील परस्पर हितसंबंध द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. मोदींना या दौऱ्यात संयुक्त अरब अमिरातचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘जायद’ प्रदान केला जाणार आहे. हा पुरस्कार एप्रिल मध्ये भारत आणि संयुक्त अरब अमिरात मधील संबंध दृढ केल्याबद्दल जाहीर केला होता. संयुक्त अरब अमिरातचे संस्थापक जनक शेख जाएद बिन सुलतान अल नाह्यान यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. विशेष म्हणजे शेख जाएद बिन सुलतान अल नाह्यान यांच्या जन्मशताब्दी वर्षात पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

बहरिन दौरा

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ आणि २५ ऑगस्ट दरम्यान बहरिनचा दौरा देखील करणार आहे. आपल्या बहरिन दौऱ्यात मोदी मनमा येथे श्रीनाथजी मंदिराच्या नूतनीकरणाचे उदघाटन करणार आहेत. बहरिनला भेट देणारे नरेंद्र मोदी पहिले भारतीय पंतप्रधान असणार आहे. मोदी बहरिनचे पंतप्रधान प्रिन्स शेख खलिफा बिन सलमान अल खलिफा यांची भेट घेतील आणि विविध विषयांवर चर्चा करतील. या भेटीदरम्यान मोदी द्विपक्षीय संबंधांवर तसेच संपूर्ण विविध क्षेत्रातील तसेच परस्पर स्वारस्याच्या आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांविषयी चर्चा करतील. बहरिनचे राजे शेख हमद बिन ईसा अल खलीफा यांनी पंतप्रधान मोदींसाठी खास मेजवानीचे आयोजन देखील केले आहे.

पंतप्रधान मोदी ‘जी-७’ संमेलनात घेणार सहभाग 

फ्रांसचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विशेष निमंत्रणावरून २५ आणि २६ ऑगस्ट दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जी-७’ संमेलनात सहभाग घेणार आहे. या संमेलनात पर्यावरण संरक्षण, वातावरण बदल, सामुद्रिक जीवन आणि डिजिटल क्रांती या विषयांवर चर्चा होणार आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -