घरदेश-विदेशचोर ऑपरेशन थिएटरमध्ये आणि पोलीस वेटिंगमध्ये...

चोर ऑपरेशन थिएटरमध्ये आणि पोलीस वेटिंगमध्ये…

Subscribe

मध्यप्रदेशमध्ये पोलिसांना घाबरुन चोरट्यांनी चोरलेले मंगळसूत्र गिळल्याची घटना घडली. मध्यप्रदेशच्या जबलपूरमधील घटना आहे. ऑपरेशन करुन हे मंगळसूत्र काढण्यात आले.

चोराने गिळलेल्या मंगळसुत्राला काढण्यासाठी पोलिसांना चक्क हॉस्पिटल गाठण्याची वेळ आली. मध्यप्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. एका वृध्द महिलेच्या गळ्यातले मंगळसूत्र चोरट्यांनी चोरले. पोलिसांनी पाठलाग करत या आरोपींना पकडले. मात्र झाडाझडती दरम्यान पोलिसांना आरोपींकडे मंगळसूत्र सापडले नाही. या आरोपींची कसून चौकशी केली असता पोलिसांच्या धाकामुळे यामधील एका आरोपीने हे मंगळसूत्र गिळल्याची धक्कादायक बाब समोर आली. पोलीस या आरोपीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. ऑपरेशन करुन हे मंगळसुत्र बाहेर काढण्यात आले.

अशी केली चोरी

जबलपूरच्या डिफेन्स कॉलनीमध्ये रहाणाऱ्या कलावती यादव ही ७० वर्षाची महिला सायंकाळी ५ वाजता घरासमोरील अंगणात बसल्या होत्या. दरम्यान मोटारसायकलवरुन दोन चोरटे आले. यामधील एका आरोपींनी कलावती यांना पाणी मागितले. त्या जशा पाणी आणायला घरामध्ये गेल्या तसे एका आरोपीने त्यांच्या मागे जाऊन गळ्यातले मंगळसुत्र हिस्कावले आणि तिथून बाईकवरुन पळ काढला. मंगळसूत्र चोरीनंतर कलावती यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे त्यांच्या शेजारी रहाणारे नागरिक जमा झाले. आरोपी मोटारसायकलवरुन पळून गेले. स्थानिकांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर ताबडतोब धाव घेत. आरोपींचा पाठलाग करत त्यांना अटक केली.

- Advertisement -

ऑपरेशन करुन काढले मंगळसुत्र

पोलिसांनी आरोपींना अटक तर केली मात्र त्यांच्याकडे त्यांना मंगळसूत्र काही सापडले नाही. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यामधील सुरज डुमार या आरोपीने मंगळसूत्र गिळल्याचे समोर आले. पोलिसांनी या मंगळसुत्रासाठी आरोपीला उलट्या काढायला लावल्या. मात्र मंगळसुत्र मिळाले नाही. त्यानंतर पोलिसांनी या आरोपीला नेताजी सुभाषचंद्र बोस मेडिकल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्याठिकाणी सुरज डुमारचे ऑपरेश करुन हे मंगळसुत्र काढण्यात आले.

बाईकची नंबर प्लेट बदलून करायचे चोरी

सुरज डुमार आणि राजू थापा हे दोन्ही आरोपी बाईकची नंबर प्लेट बदलून चोरी करायचे. शहरामधील विविध भागामध्ये फिरुन ते घरातील वृध्द महिलांना चोरीसाठी लक्ष्य करायचे. या चोरांनी त्यांच्या बाईकसाठी वेगवेगळ्या नंबर प्लेट तयार करुन ठेवल्या होत्या. चोरी केल्यानंतर ताबडतोब ते ही नंबर प्लेट बदलायचे.

- Advertisement -

पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून मंगळसुत्र जप्त करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी केलेल्या या कामगिरिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या कामगिरीसाठी सर्व पोलिसांना पोलीस अधिक्षकांनी १० हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -